पुणे : केक म्हणजे फक्त चविष्ट खाद्यपदार्थ नाही, तर तो एक कलात्मक सृजनाचा भागही देखील आहे. केक आर्टिस्ट प्राची धबल देब यांचा प्रवास आज जागतिक स्तरावर पोहोचला आहे. केक तयार करत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये तीन जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात सन्मान मिळवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या केक आर्टिस्ट ठरल्या आहेत. त्यांचा हा प्रवास कसा झाला जाणून घेऊ.