पुणे : पुणे शहराची खाद्यसंस्कृती ही नेहमीच चव आणि परंपरेचा संगम म्हणून ओळखली जाते. मिसळ, वडापाव, आमटी-भात, लेमन टी अशा अनेक पदार्थांप्रमाणेच भेळही पुणेकरांच्या चवीचा एक अविभाज्य भाग आहे. याच चवीला गेल्या 57 वर्षांपासून आपल्या खास अंदाजात जपणारे ठिकाण म्हणजे रास्ता पेठेतील प्रसिद्ध इंटरव्हल भेळ. 1968 साली सुरू झालेलं हे ठिकाण आजही पुणेकरांच्या इव्हनिंग स्नॅक्स चा अविभाज्य भाग बनलं आहे.