TRENDING:

Astrology: आलेली संकटं आपोआप मार्गातून दूर! गुरु-शुक्राच्या लाभदृष्टीचा या राशींना होणार फायदा

Last Updated:
Astrology Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे वेळोवेळी संक्रमण होतं आणि ते इतर ग्रहांशी युती करतात, त्याचा परिणाम मानवी जीवनावर म्हणजेच संपूर्ण राशीचक्रावर दिसून येतात. आज 8 ऑक्टोबर, बुधवार रोजी ज्योतिषशास्त्रातील दोन सर्वात शुभ ग्रह एकमेकांपासून 60° च्या कोनात असतील. यामुळे लाभ दृष्टी योग निर्माण होईल, तो काही राशींचे भाग्य उजळवू शकतो. शिवाय, उत्पन्नात आणि करिअरमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत..
advertisement
1/6
आलेली संकटं आपोआप मार्गातून दूर! गुरु-शुक्राच्या लाभदृष्टीचा या राशींना फायदा
धनु राशी - गुरू आणि शुक्र यांचा लाभ दृष्टी योग या राशीसाठी शुभ ठरू शकतो. हा दृष्टी योग तुमच्या कर्मभावावर प्रभाव पाडेल. त्यामुळे कंपन्यांमध्ये उच्च पदांवर असलेल्यांना नेतृत्वाच्या नवीन संधी मिळू शकतात. परदेश प्रवासात किंवा परदेशाशी संबंधित कामातही यश मिळू शकते. 
advertisement
2/6
धनु राशीच्या बेरोजगार लोकांना नोकऱ्या मिळू शकतात. व्यवसायातही लक्षणीय नफा मिळू शकतो. प्रलंबित प्रकल्प पूर्ण होतील. नोकरीत असलेल्यांना आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. या काळात कुटुंब आणि वडिलांशी संबंध चांगले राहतील.
advertisement
3/6
कर्क रास - गुरू आणि शुक्र यांचा लाभ दृष्टी योग कर्क राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो. हा योग तुमच्या संक्रमण कुंडलीतील नशिबावर आणि परदेश स्थानांवर प्रभाव टाकेल. या काळात तुम्ही लहान किंवा लांबचा प्रवास करू शकता. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत देखील आहेत.
advertisement
4/6
कर्क राशीच्या सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय संधी निर्माण होतील आणि कोणत्याही रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळू शकते. यावेळी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होऊ शकता.
advertisement
5/6
वृषभ राशी - गुरू आणि शुक्र यांचा लाभदृष्टी योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण हा योग तुमच्या राशीच्या लग्न आणि सप्तम भावांवर प्रभाव टाकेल. त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. या काळात विवाहित व्यक्तींनाही आनंदी वैवाहिक जीवन अनुभवायला मिळेल.
advertisement
6/6
व्यवसायात असलेल्या वृषभ राशीच्या लोकांना नवीन करार किंवा भागीदारीचा प्रस्ताव मिळू शकतो, तो भविष्यात फायदेशीर ठरेल. तुमचा बँक बॅलन्स वाढेल, तुम्हाला तुमच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगती मिळेल. अविवाहित व्यक्तींनाही चांगला जोडीदार मिळू शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: आलेली संकटं आपोआप मार्गातून दूर! गुरु-शुक्राच्या लाभदृष्टीचा या राशींना होणार फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल