Gajkesari yog 2025: दिवाळी आधीच चंगळ! धनत्रयोदशीआधी गजकेसरी योग जुळल्यानं 3 राशींचा भाग्योदय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Marathi Astrology: यंदा दसरा-दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यातच आला आहे. या वर्षी धनत्रयोदशीचा सण शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती असंही म्हणतात. पंचांगानुसार, यावर्षी धनत्रयोदशी आधी गजकेसरी योग तयार होणार आहे. 12 ऑक्टोबर रोजी मिथुन राशीत गुरु आणि चंद्राची युती होईल, ज्यामुळे गजकेसरी योग निर्माण होईल.
advertisement
1/6

धनत्रयोदशी हा दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाची सुरुवात करणारा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला हा सण साजरा केला जातो. धन आणि 'त्रयोदशी' (तेरावी तिथी) या दोन शब्दांवरून त्याचे नाव पडले आहे.
advertisement
2/6
या दिवसाला धार्मिक आणि पौराणिकदृष्ट्या खूप मोठे महत्त्व आहे, पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी (देवांचे वैद्य आणि विष्णूचा अवतार) हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते. धन्वंतरी हे आयुर्वेदाचे देव मानले जातात.
advertisement
3/6
ज्योतिषशास्त्रात गजकेसरी योग खूप शुभ आणि फायदेशीर मानला जातो. हा राजयोग एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत तयार होतो तेव्हा त्यांच्या आयुष्यात मानसिक शांती आणि आनंद येऊ लागतो. याव्यतिरिक्त, हा योग धन, संपत्ती, कीर्ती, आदर, चांगले आरोग्य आणि आनंदी कौटुंबिक जीवन मिळवून देतो. हा योग शिक्षण, व्यवसाय किंवा राजकारण अशा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात अपार यश मिळवून देतो. 12 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या गजकेसरी योगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल, ते जाणून घेऊया.
advertisement
4/6
वृषभ - गजकेसरी योग वृषभ राशीच्या लोकांना लाभदायी ठरू शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे आता पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगती आणि प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांसाठी हा योग्य काळ आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम होईल, कुटुंबात आनंद वाढेल.
advertisement
5/6
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिकदृष्ट्या खूप शुभ राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. हा काळ व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबात सुसंवाद राहील आणि प्रेम जीवनही गोड होईल.
advertisement
6/6
कन्या - या योगामुळे कन्या राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. त्यांना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात. मानसिक शांती राहील आणि आरोग्यही सुधारेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Gajkesari yog 2025: दिवाळी आधीच चंगळ! धनत्रयोदशीआधी गजकेसरी योग जुळल्यानं 3 राशींचा भाग्योदय