बॉलिवूड अभिनेत्रीच्या वडिलांची दहशतवाद्यांनी केली हत्या, काश्मीर हल्ल्यात गमावलेला जीव
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील 27 जणांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. काश्मीरमधील अशाच एका घटनेत प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांना जीव गमवावा लागला होता.
advertisement
1/8

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील 27 जणांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. काश्मीरमधील अशाच एका घटनेत प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांना जीव गमवावा लागला होता. नुकत्याच झालेल्या घटनेमुळे अभिनेत्रीच्या वडिलांसोबत घडलेला दुर्देवी प्रसंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
advertisement
2/8
'एअरलिफ्ट' आणि 'दासवी' सारख्या चित्रपटांतून आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री निम्रत कौर. आज ती एक यशस्वी अभिनेत्री आहे. मात्र तिला लहानपणी एका मोठ्या धक्क्यातून जावं लागलं होतं.
advertisement
3/8
निम्रत कौर हिच्या बालपणीची कहाणी ऐकून कोणाचेही मन हेलावून जाईल. जेव्हा ती फक्त ११ वर्षांची होती, तेव्हा दहशतवाद्यांनी तिच्या वडिलांची हत्या केली होती. निम्रतचे वडील भूपिंदर सिंग हे भारतीय लष्करात मेजर होते आणि शहीद होण्यापूर्वी ते काश्मीरमध्ये तैनात होते. 1994 साली काश्मीरमध्ये कार्यरत असताना मेजर भूपिंदर सिंग यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.
advertisement
4/8
दहशतवाद्यांनी त्यांच्या सुटकेसाठी काही मागण्या केल्या होत्या, पण त्या मान्य झाल्या नाहीत. दुर्दैवाने, अपहरणाच्या एका आठवड्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेने निम्रत आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
advertisement
5/8
एका लहान मुलीच्या नाजूक मनावर दहशतवादाने कधीही न विसरणारा घाव घातला होता.निम्रत कौरने अनेक मुलाखतींमध्ये आपल्या वडिलांबद्दल आणि त्या दुःखद घटनेबद्दल सांगितले आहे.
advertisement
6/8
तिने आठवण करून दिली की तिचे वडील एक कणखर आणि प्रेमळ व्यक्ती होते. त्यांनी तिला मुलाप्रमाणे वाढवले आणि तिच्यात आत्मविश्वास आणि ध्येय गाठण्याची जिद्द निर्माण केली. वडिलांच्या आठवणी आजही तिच्या मनात ताज्या आहेत आणि त्यांचे बलिदान ती कधीही विसरू शकत नाही.
advertisement
7/8
शहीद मेजर भूपेंद्र सिंह यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1952 रोजी राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्ह्यातील मोहनपुरा येथे झाला होता. ते एक निष्ठावान आणि पराक्रमी सैनिक होते. देशासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर 'शौर्य चक्र' देऊन सन्मानित करण्यात आले.
advertisement
8/8
जवळपास 30 वर्षांनंतर, शहीद मेजर भूपेंद्र सिंह यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्मगावी एक स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाचे अनावरण खुद्द निम्रत कौर आणि तिच्या कुटुंबीयांनी केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉलिवूड अभिनेत्रीच्या वडिलांची दहशतवाद्यांनी केली हत्या, काश्मीर हल्ल्यात गमावलेला जीव