TRENDING:

'तो अचानक व्हॅनिटी व्हॅनमध्ये घुसला आणि...'; सहकलाकाराबाबत पूजा हेगडेचा शॉकिंग खुलासा

Last Updated:
Pooja Hegde Shocking Incident : साऊथ ते बॉलिवूडपर्यंत धुमाकूळ घालणारी पूजा हेगडेने नुकतंच एका मुलाखतीत शॉकिंग खुलासा केला आहे. करिअरच्या सुरुवातीला अभिनेत्रीला गैरवर्तनाचा सामना करावा लागला होता.
advertisement
1/7
'तो अचानक व्हॅनिटी व्हॅनमध्ये घुसला आणि...'; पूजा हेगडेचा शॉकिंग खुलासा
अभिनेत्री पूजा हेगडेने साऊथ ते बॉलिवूडपर्यंत आपल्या दर्जेदार अभिनय प्रेक्षकांच्या मनावर अधिकराज्य गाजवलं आहे. अभिनयासह लुक्स आणि सौंदर्यामुळे अभिनेत्री चर्चेत असते.
advertisement
2/7
पूजा हेगडेने आता एक शॉकिंग खुलासा केला आहे. करिअरच्या सुरुवातीला पूजा एका पॅन इंडिया सिनेमाचा भाग होती. त्यावेळी सहकलाकाराने तिच्यासोबत गैरववर्तन केलं होतं. अभिनेत्रीच्या व्हॅनिटी वॅनमध्ये तो परवानगीशिवाय घुसला होता. त्यावेळी अभिनेत्री अनकंफर्टेबल झाली होती.
advertisement
3/7
पूजा हेगडेने नुकतंच एका मुलाखतीत आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील कटू अनुभव शेअर केले. यावेळी शॉकिंग खुलासा करत अभिनेत्रीने सांगितलं की, ती एका पॅन इंडिया सिनेमाचा भाग होती. त्यावेळी एका मोठ्या प्रोजेक्टचा भाग असल्याने ती आनंदी होती. पण काही काळातच तिच्या उत्साहाचं रुपांतर भीतीमध्ये झालं.
advertisement
4/7
पूजाने खुलासा केला की, शूटिंगदरम्यान सह-कलाकार परवानगी न घेता व्हॅनिटी व्हॅनमध्ये घुसला होता. तसेच त्यावेळी त्या अभिनेत्याने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा दावाही यावेळी अभिनेत्रीने केला. दरम्यान अभिनेत्रीने जोरात धक्का देत त्या अभिनेत्याला व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर काढलं.
advertisement
5/7
पूजाने या घटनेनंतर त्या अभिनेत्यासोबत कधीही काम करायचं नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे त्या अभिनेत्यासोबतचा सीन पूजाने बॉडी डबलच्या मदतीने पूर्ण केला. पूजाने ही घडलेली घटना सांगितली असली तरी तिने त्या अभिनेत्याचं नाव रिव्हिल केलेलं नाही.
advertisement
6/7
पूजा हेगडेचा 'जय नायकन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पूजा थलापती विजयसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. 26 जानेवारी 2026 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
advertisement
7/7
पूजा हेगडेने 'मोहनजो दारो' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. राधे श्याम, सर्कारू, वैकुंठापुरमुलू अशा अनेक हिट चित्रपटांत पूजा हेगडेच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तो अचानक व्हॅनिटी व्हॅनमध्ये घुसला आणि...'; सहकलाकाराबाबत पूजा हेगडेचा शॉकिंग खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल