Prajakta Mali: 'खूप चढ-उतार आले, पण 10 वर्षे एकत्र राहिलो', प्राजक्ता माळीची भावनिक पोस्ट
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Prajakta Mali: मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी. ती नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. मोठा चाहता वर्ग असल्यामुळे तिची कोणतीही पोस्ट असो, फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच धुमाकूळ घालतात.
advertisement
1/7

मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी. ती नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. मोठा चाहता वर्ग असल्यामुळे तिची कोणतीही पोस्ट असो, फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच धुमाकूळ घालतात.
advertisement
2/7
प्राजक्ता माळीची नवी पोस्ट सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. तिने 10 वर्ष एकत्र राहिल्याविषयी एक खास पोस्ट शेअर केली. तिची ही भावनिक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
3/7
खरं तर प्राजक्ता माळीने तिच्या घराच्या दहा वर्षांच्या प्रवासावर एक भावनिक पोस्ट शेअर केलीय. प्राजक्ता राहत असलेल्या घराला 10 वर्ष पूर्ण झाले. याच निमित्ताने तिने ही पोस्ट शेअर केलीय.
advertisement
4/7
"मी आणि माझे घर... 10 वर्षे एकत्र राहिलो" अशा शब्दांत तिने तिच्या पहिल्या घराच्या आठवणी जागवल्या आहेत. या घराने केवळ तिला निवारा दिला नाही, तर तिच्या आयुष्यातील अनेक भावनिक क्षणांचा साक्षीदारही ठरला.
advertisement
5/7
प्राजक्ताने सांगितले की, या घरात तिने ध्यानधारणा केली, संघर्षाचे दिवस पाहिले, आनंद साजरे केले, नृत्याचा सराव केला आणि कधी एकटीने रडलीसुद्धा. या घराने तिच्या कारकिर्दीतील सर्व चढ-उतार पाहिले आहेत. "या सौंदर्याने मला सर्व आराम, शांती आणि मुंबईत परत राहण्याचे एक मजबूत कारण दिले," असेही तिने लिहिले.
advertisement
6/7
या खास प्रसंगी प्राजक्ताने तिच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' कुटुंबासोबत गुरुपूजा, रुद्रपूजा आणि मंत्र-भजनांनी घराची ऊर्जा वाढवली. अमोल वाघळे भैय्या आणि त्यांच्या टीमच्या उपस्थितीत घरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.
advertisement
7/7
दरम्यान, प्राजक्ताने घराची झलक शेअर करताच चाहत्यांनीही पोस्टवर भरभरुन कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali: 'खूप चढ-उतार आले, पण 10 वर्षे एकत्र राहिलो', प्राजक्ता माळीची भावनिक पोस्ट