TRENDING:

'चिंब पावसाळी…' प्राजक्ता माळीच्या फोटोंचा सोशल मीडियावर धूर, फॅन म्हणतो 'सांभाळून, नाहीतर मागून साप...'

Last Updated:
Prajakta Mali : प्राजक्ता सतत काही ना काही नवं करण्याच्या प्रयत्नात असते. मग तो चित्रपट असो, तिचा व्यवसाय असो की मग तिचं खाजगी आयुष्य असो.
advertisement
1/5
प्राजक्ता माळीच्या फोटोंचा सोशल मीडियावर धूर, फॅन म्हणतो 'सांभाळून, नाहीतर...'
सर्वांच्या लाडक्या प्राजक्ता माळीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. जुळून येती रेशिमगाठी पासून सुरू झालेला तिचा प्रवास अजूनही तुफान सुरू आहे.
advertisement
2/5
प्राजक्ता सतत काही ना काही नवं करण्याच्या प्रयत्नात असते. मग तो चित्रपट असो, तिचा व्यवसाय असो की मग तिचं खाजगी आयुष्य असो. प्राजक्ता तिच्या लाइफ अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते.
advertisement
3/5
प्राजक्ताने नुकताच 'आर्ट ऑफ लिव्हिंग' या संस्थेचा 'संयम 2' हा विशेष ध्यान व साधनेसंबंधी कोर्स पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे, हा तिचा या संस्थेतील दुसरा कोर्स असून, यापूर्वीही तिने 'सुदर्शन क्रिया' संबंधित प्रशिक्षण पूर्ण केलं होतं.
advertisement
4/5
अशातच प्राजक्ताने सोशल मीडियावर तपकिरी रंगाच्या कॉटन साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी तिने स्वतःच्या ब्रँडचे दागिने परिधान केले आहेत. तिने सुंदर नागाचा बाजूबंदही घातला आहे. प्राजक्ताने तिच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, 'मन अन् भोवताल दोन्ही चिंब पावसाळी… (ऐन मे मध्ये) पण पावसाळा आपल्याला आवडतोच… त्यामुळे काही हरकत नाही.'
advertisement
5/5
दरम्यान, प्राजक्ताचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्यांनी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मात्र एका चाहत्याने प्राजक्ताच्या पोस्टवर भन्नाट कमेंट करत लिहिलं आहे की, 'बाजूबंद सापाचा आहे... जरा सांभाळून, मागच्या झाडीतून नागीण येईल'.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'चिंब पावसाळी…' प्राजक्ता माळीच्या फोटोंचा सोशल मीडियावर धूर, फॅन म्हणतो 'सांभाळून, नाहीतर मागून साप...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल