Prajakta Mali : घरच्यांनी शोध शोध शोधलं, अखेर खाटेखाली सापडली प्राजक्ता माळी, करत काय होती! स्वत:चं सांगितलं
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Prajakta Mali : प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान लहानपणीचा एक किस्सादेखील अभिनेत्रीने शेअर केला आहे.
advertisement
1/7

प्राजक्ता माळी मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. 'लोअर मिडल क्लास' फॅमिलीमध्ये अभिनेत्री लहानाची मोठी झाली आहे. राजश्रीला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने आपलं बालपण, स्वभाव, घरची परिस्थिती, आईचा मार याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
2/7
प्राजक्ता माळी म्हणाली,"लोअर मिडल क्लास फॅमिलीत माझा जन्म झाला आहे. माझे वडील पोलीस खात्यात हवालदार होते. स्वारगेट पोलीस ठाण्यात आम्ही किती तरी वर्षे राहिलो. जन्मापासून ते सहा वर्षांची होईपर्यंत मी स्वारगेट पोलीस ठाण्यात राहिले आहे. नंतर आम्ही वाकड पोलीस लाईनमध्ये राहायला होतो".
advertisement
3/7
प्राजक्ता म्हणाली,"पुढे सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये होतो आणि मग आम्ही आताच्या घरी शिफ्ट झालो. माझे आजोबा पोलीस खात्यात होते. वडील पोलीस खात्यात होते. लहानपणी सगळं हाता तोंडाशी होतं. माझे आजोबा त्यांच्या लहानपणी सोलापूरहून पुण्यात शिफ्ट झाले होते. त्यामुळे त्यांनीही त्यांचं बस्तान त्याकाळी बसवलं. वडिलांनीही त्यावर हळूहळू मनोरे रचले आणि आता आम्ही त्यावर अंलकृत करण्याचं काम करत आहोत. वडिलांना सुरुवातीच्या काळात भरपूर स्ट्रगल करावा लागला. कारण त्यांच्यावर त्यांची पाच भावंडे अवलंबून होती. त्यावेळी ते एकटे कमावते होते".
advertisement
4/7
शाळा-कॉलेजमध्ये असताना प्राजक्ता माळी आजच्यापेक्षा पूर्णपणे विरोधात होती. अतिशय शांत, लाजाळू, नाकासमोर चालणारी, छोट्या सर्कलमध्ये वावरणारी प्राजक्ता माळी होती.
advertisement
5/7
प्राजक्ता माळी पुढे म्हणाली,"एकदा जागेवरुन उठ, आता ते पुस्तक बाजूला ठेव आणि मैत्रिणीकडे जाऊन जरा खेळ यावरुन मी आईचा मार खाल्ला आहे".
advertisement
6/7
बालपणीचा एक किस्सा शेअर करत प्राजक्ता माळी म्हणाली,"एका रात्री मी तीन वर्षांची असताना घरातीला कोणाला मी सापडत नव्हते. सगळे मला शोधत होते. साडेतीन तास हे नाट्य सुरू होतं आणि मी खाटेखाली सापडले. साडेतीन तास काहीही आवाज न करता मी भातुकली खेळत होते. मी इतकी शांत होते की कोणाला कळलंच नाही मी कुठे आहे ते".
advertisement
7/7
प्राजक्ता माळीने मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक चित्रपटांत, मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे प्राजक्ता घराघरांत पोहोचली. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : घरच्यांनी शोध शोध शोधलं, अखेर खाटेखाली सापडली प्राजक्ता माळी, करत काय होती! स्वत:चं सांगितलं