Prajakta Mali: 'मी जळून जाईल, पण तुला नजर लागू देणार नाही' प्राजक्ताचा सतरंगी साज, चाहत्यांच्या कमेंटचा भडीमार!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Prajakta Mali: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे तिचा भन्नाट सतरंगी लूक आहे. तिच्या लेटेस्ट फोटोंनी तर सोशल राडाच घातला आहे.
advertisement
1/7

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे तिचा भन्नाट सतरंगी लूक आहे. तिच्या लेटेस्ट फोटोंनी तर सोशल राडाच घातला आहे.
advertisement
2/7
प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर सतरंगी ड्रेसमधले काही फोटो शेअर केले. काही क्षणांतच हे फोटो व्हायरल झाले. चाहत्यांनी तिच्या कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव केला.
advertisement
3/7
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने सप्तरंगी ड्रेस घातला आहे. प्राजक्ताने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "हा ड्रेस पाहिल्यावर जो पहिला विचार मनात आला…सप्तरंगी."
advertisement
4/7
तिचा सतरंगी लूक ही केवळ एक स्टाईल स्टेटमेंट नसून, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा रंगीबेरंगी झलक देखील आहे. त्यामुळे लोकांनी तूदेखील तुझ्या ड्रेससारखीच कलरफुल असल्याचं म्हटलं.
advertisement
5/7
तिने फोटो शेअर करताच चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा भडीमार केला. आणि प्राजूचं तोंडभरुन कौतुक केलं, एकाने तर लिहिलं, “मी जळून जाईल पण तुला नजर लागू देणार नाही.” दुसरा चाहता म्हणतो, “तू तर थेट इंद्रधनुषी अप्सरा वाटतीस!”
advertisement
6/7
प्राजक्ताची स्टाइल सेन्स आणि आत्मविश्वास प्रत्येक फोटोमध्ये दिसून येतो. साडीपासून वेस्टर्न आउटफिटपर्यंत ती प्रत्येक लूकमध्ये आपला वेगळा ठसा उमटवते. तिच्या अभिनयासोबतच तिची फॅशन निवडसुद्धा तिच्या चाहत्यांना नेहमीच आकर्षित करत आली आहे.
advertisement
7/7
अभिनय, सौंदर्य, आणि स्पष्टवक्तेपणामुळे प्राजक्ता नेहमीच चर्चेत असते. तिने मेहनतीने आज प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ती मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali: 'मी जळून जाईल, पण तुला नजर लागू देणार नाही' प्राजक्ताचा सतरंगी साज, चाहत्यांच्या कमेंटचा भडीमार!