पतीने घटस्फोट देताच कॅन्सरने गाठलं, आई-भावाचा मृत्यू, शाहरुखसोबत झळकलेल्या मराठी अभिनेत्रीचा दुर्दैवी अंत
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Priya Tendulkar हिने ‘Rajani’ मालिकेतून लोकप्रियता मिळवली, पण वैयक्तिक आयुष्यात दु:ख, घटस्फोट, कॅन्सर आणि हृदयविकारामुळे तिचा शेवट दुर्दैवी झाला.
advertisement
1/7

मुंबई: मराठीतील प्रसिद्ध लेखकाच्या कन्येने मनोरंजन विश्व गाजवलं होतं. अभिनयाचा वारसा नसतानाही त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. एअर होस्टेसपासून ते न्यूज रीडरपर्यंत अनेक कामं केल्यानंतर त्या अभिनयाच्या क्षेत्रात आल्या.
advertisement
2/7
‘रजनी’ या मालिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली, पण एका क्षणात त्यांच्या आयुष्यात असं वादळ आलं की त्या पुन्हा कधीच सावरू शकल्या नाहीत. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिचा शेवट खूपच दुर्दैवी झाला.
advertisement
3/7
मराठीतील प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांची कन्या प्रिया तेंडुलकर सुरुवातीला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी एअर होस्टेस म्हणूनही काम केलं.
advertisement
4/7
काही काळ न्यूज रीडर म्हणूनही काम केल्यानंतर त्यांनी मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवलं. त्यानंतर १९७४ मध्ये श्याम बेनेगलच्या ‘अंकुर’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.
advertisement
5/7
प्रिया यांनी ‘देवता’, ‘मोहरा’, ‘गुप्त’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. पण, त्यांना खरी ओळख १९८५ साली ‘रजनी’ या मालिकेमुळे मिळाली. या शोमध्ये त्यांनी एका सामान्य गृहिणीची भूमिका केली होती, जी रोजच्या समस्यांशी लढते. ‘रजनी’ इतकी हिट झाली की, लोक आजही त्यांना ‘रजनी’ म्हणूनच ओळखतात.
advertisement
6/7
प्रियाच्या आयुष्यात खूप यश आलं, पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र खूप दु:खी होतं. त्यांनी १९८८ मध्ये अभिनेता करण राजदानसोबत लग्न केलं, पण ७ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांची आई आणि भावाचं निधन झालं, ज्यामुळे त्या पूर्णपणे खचल्या.
advertisement
7/7
१९९९ मध्ये कळलं की त्यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे. त्यांनी या आजाराशी खूप काळ संघर्ष केला. पण, १९ सप्टेंबर २००२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पतीने घटस्फोट देताच कॅन्सरने गाठलं, आई-भावाचा मृत्यू, शाहरुखसोबत झळकलेल्या मराठी अभिनेत्रीचा दुर्दैवी अंत