TRENDING:

कर्नाटकात बालपण, तामिळनाडूमध्ये करिअर; मग साऊथ स्टार रजनीकांत यांची मातृभाषा मराठी कशी?

Last Updated:
Rajinikanth Mother Tongue : अभिनेते रजनीकांत यांचं बालपण कर्नाटकमध्ये गेलं. तर त्यांनी करिअरमध्ये साऊथ इंडस्ट्रीत केलं. पण त्यांची मातृभाषा ही मराठी कशी काय?
advertisement
1/8
कर्नाटकात बालपण, तामिळनाडूमध्ये करिअर; मग रजनीकांत यांची मातृभाषा मराठी कशी?
साऊथ सिनेसृष्टीतील कलाकारांची नावं घेतली तर त्यात एक नाव टॉपवर येतं ते म्हणजे सुपरस्टार रजनीकांत. वयाच्या सत्तरीतरी ते एक्शन सिनेमात काम करतात. साऊथमध्ये लोक त्यांना देवसमान मानतात. त्यांनीही अनेक वर्ष त्यांची सुपरस्टारवाली इमेज जपून ठेवली आहे.
advertisement
2/8
पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की रजनीकांत यांचं बालपण कर्नाटकात गेलं, त्यांनी करिअर केलं तमिळनाडूमध्ये त्यानंतर ते झाले साऊथचे सुपरस्टार मग त्यांची मातृभाषा मराठी कशी?
advertisement
3/8
रजनीकांत यांचं शालेय शिक्षण बंगळुरूमध्ये झालं. ते चार वर्षांचे असताना त्यांची आई गेली. तेव्हा घराची परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यांना लहान वयात काम करावं लागलं. हमाल पासून कंटक्टर पर्यंत अनेक काम रजनीकांत यांनी केली.
advertisement
4/8
रजनीकांत यांच्यात लहानपणापासून अभिनयाची आवड होती. अभिनेता बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे मित्र राज बहादुर यांनी मदत केली. त्यांनी रजनीकांत यांचा मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यास मोटिवेट केलं. त्यांच्या काही कंटक्टर मित्रांनी त्यांना मदत केली. अभिनय क्षेत्रात येत असताना त्यांनी तमिळ भाषा शिकली.
advertisement
5/8
'अपूर्वा रागनगाल' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. ज्यात त्यांना छोटीशी भूमिका मिळाली होती. सुरुवातीचे 2-3 वर्ष त्यांनी अशाप्रकारचे साइड रोल केले. त्यांच्या भूमिका बऱ्यापैकी निगेटिव्ह असायच्या. 'भुवन ओरू केल्विकुरी' या सिनेमात ते पहिल्यांदा हिरो म्हणून समोर आले. त्यांचं काम प्रेक्षकांना आवडलं आणि पुढच्या 25सिनेमात ते हिरो म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले.
advertisement
6/8
रजनीकांत यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दहा वर्षात एकूण 100 सिनेमे केले. त्यांनी काही कन्नड नाटकातही काम केलं. त्यांना तमिळही येत होती.
advertisement
7/8
रजनीकांत यांना तमिळ, हिंदी, मल्याळम, कन्नड आणि तेलुगु भाषा येतात. पण त्यांची मातृभाषा ही मराठी आहे. कारण रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 साली बंगळुरूमधील एका मराठी कुटुंबात झाला.
advertisement
8/8
रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजी राव गायकवाड. त्यांच्या आईचं नाव जीजाबाई आणि वडिलांचं नाव रामोजी गायकवाड. रामोजी यांना चार मुलं होती. त्यातील रजनीकांत हे सर्वात शेवटचे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कर्नाटकात बालपण, तामिळनाडूमध्ये करिअर; मग साऊथ स्टार रजनीकांत यांची मातृभाषा मराठी कशी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल