ज्याने काम द्यायचं आश्वासन दिलं, त्याच्यावरच भडकले राजपाल यादव! सोनू सूदला सुनावले खडेबोल, नक्की काय झालं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rajpal Yadav on Sonu Sood: राजपाल अडचणीत असताना सोनू सूदने सर्वात आधी मदतीचा हात पुढे केला. मात्र, सोनूने केलेल्या मदतीच्या आवाहनावर आता राजपाल यादव यांनी चक्क नाराजी व्यक्त करत त्याला खडेबोल सुनावले आहेत.
advertisement
1/8

९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंगाची हवा खाऊन बाहेर आलेले बॉलिवूडचे दिग्गज विनोदी अभिनेते राजपाल यादव सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.
advertisement
2/8
राजपाल अडचणीत असताना ज्या अभिनेत्याने सर्वात आधी मदतीचा हात पुढे केला, तो म्हणजे 'गरीबांचा कैवारी' सोनू सूद. मात्र, सोनूने केलेल्या मदतीच्या आवाहनावर आता राजपाल यादव यांनी चक्क नाराजी व्यक्त करत त्याला खडेबोल सुनावले आहेत.
advertisement
3/8
राजपाल यादव तुरुंगात असताना सोनू सूदने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून चित्रपट निर्मात्यांना राजपाल यांना काम देण्याची विनंती केली होती. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर राजपाल यांनी एका मुलाखतीत सोनूच्या या भूमिकेवर थेट आक्षेप घेतला.
advertisement
4/8
ते म्हणाले, "कृपया हा गैरसमज आधी दूर करा की मला वारंवार कोणाकडे तरी काम मागावं लागतं. काम मागण्यात मला लाज वाटत नाही, पण माझं कामच मला चारपट जास्त काम मिळवून देतं. मी सुट्ट्यांच्या दिवशीही काम करतो. गेल्या ११ वर्षांपासून काम माझ्यासोबतच जगतंय, मला ते शोधत फिरावं लागत नाही."
advertisement
5/8
सोनू सूदच्या मदत करण्याच्या विधानामुळे आपली प्रतिमा एका गरजू कलाकारासारखी झाल्याचा राजपाल यांचा समज झाला असावा.
advertisement
6/8
आपली ताकद दाखवून देताना ते पुढे म्हणाले की, "मी या वर्षाची सुरुवात प्रियदर्शन यांच्या 'भूत बंगला'ने करतोय. त्यानंतर २७ कलाकार असलेला 'वेलकम टू द जंगल' आहे. 'हैवान'मध्येही माझी जबरदस्त भूमिका आहे. याशिवाय दोन वेब सीरिज आणि दोन मोठे सिनेमे माझ्या खिशात आहेत, ज्याबद्दल मी आता बोलू शकत नाही."
advertisement
7/8
जेव्हा राजपाल यादव कायदेशीर कचाट्यात सापडले होते, तेव्हा सोनू सूदने 'X' वर लिहिले होते की, "राजपाल यादव हा आपल्या इंडस्ट्रीला मिळालेली एक भेट आहे. कधीकधी काळ कोणावरही अन्याय करतो. ते माझ्या चित्रपटाचा भाग असतील."
advertisement
8/8
त्यांनी पुढे म्हटलं, "मी सर्व निर्माते आणि दिग्दर्शकांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं. हे दान नाही, तर त्यांच्या कलेचा सन्मान आहे." इतकेच नाही तर सुनावणीच्या दिवशीही सोनूने राजपाल यांच्यासाठी प्रार्थना केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ज्याने काम द्यायचं आश्वासन दिलं, त्याच्यावरच भडकले राजपाल यादव! सोनू सूदला सुनावले खडेबोल, नक्की काय झालं?