TRENDING:

Holi 2026: होळीच्या रात्री लक्षात ठेवून करू नयेत अशा गोष्टी; नशिबाची साथ सुटते, कष्टाचं फळ शून्य

Last Updated:
Holi 2026: होळी-शिमग्याचे उत्साही वातावरण सर्वत्र आहे. होळी पेटवण्यासाठी मुलांचा उत्साह दाटून आला आहे, होळी दरम्यान वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. होळीचा हा सण केवळ परंपरा नाही, तर तो भावनांचा उत्सव आहे. वाईट विचारांचा नाश आणि चांगल्याचा विजय याचं प्रतीक म्हणून आपण होळी पेटवतो. भक्त प्रल्हादाची अतूट भक्ती आणि होलिकेचं दहन यांची कथा आजही आपल्या मनात श्रद्धा निर्माण करते.
advertisement
1/8
होळीच्या रात्री लक्षात ठेवून टाळाव्या या गोष्टी; नशिबाची साथ सुटते, कष्ट केरात
धार्मिक मान्यतेनुसार ही रात्र आध्यात्मिकदृष्ट्या खूप संवेदनशील मानली जाते. असं म्हणतात की या काळात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही ऊर्जा प्रभावी असतात. त्यामुळेच आपल्या कुटुंबात सुख-शांती राहावी आणि कोणतंही नुकसान होऊ नये, यासाठी काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
2/8
होळीच्या दिवशी या गोष्टी आवर्जून टाळा:घरात वाद किंवा भांडण करणे - होळी पेटवणे म्हणजे मनातील नकारात्मकता संपवणे. जर याच दिवशी घरात भांडणं किंवा चिडचिड झाली, तर सणाचा मूळ उद्देशच संपून जातो. जाणकार म्हणतात की, या दिवशी झालेला कलह मनात बराच काळ घर करून राहू शकतो. त्यामुळे रिलेशनमध्ये गोडवा ठेवा.
advertisement
3/8
वाईट बोलणे किंवा कुणाचा अपमान करणे - सण म्हणजे मनं जोडण्याची वेळ. कडू शब्द नात्यात दुरावा आणू शकतात. विशेषतः मुलांसमोर कोणाबद्दलही वाईट बोलू नका, कारण त्यांच्या मनावर याचे चुकीचे संस्कार होतात. शब्दांत संयम असणं खूप गरजेचं आहे.
advertisement
4/8
तामसी भोजन आणि नशा करणे - धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस सात्विकतेचा मानला जातो. मांसाहार किंवा मद्यपान यांपासून लांब राहणेच चांगले. अनेक घरांमध्ये या दिवशी फक्त फलाहार किंवा हलका आहार घेण्याची पद्धत आहे.
advertisement
5/8
अंघोळ न करता किंवा अस्वच्छतेने पूजा करणे - होळीची पूजा करण्यापूर्वी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालणं शुभ मानलं जातं. हा केवळ धार्मिक नियम नाही, तर स्वच्छता आणि शिस्तीचा संदेश सुद्धा आहे. पूजेमध्ये मन आणि शरीर दोन्ही पवित्र असण्यावर भर दिला जातो.
advertisement
6/8
होळीच्या अग्नीत प्लास्टिक किंवा कचरा टाकणे - अनेकदा लोक लाकडांसोबत प्लास्टिक किंवा रबर सुद्धा जाळतात. यामुळे विषारी धूर निघतो, जो आरोग्य आणि पर्यावरणासाठी खूप घातक आहे. सण साजरा करताना निसर्गाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्या. 
advertisement
7/8
गरोदर महिलांनी धुरापासून लांब राहणे - होळी पेटवताना खूप धूर आणि गर्दी असते. डॉक्टरांच्या मते गरोदर महिलांनी जास्त वेळ धुराच्या संपर्कात राहू नये. त्यामुळे अशा वेळी सुरक्षित अंतर ठेवूनच दर्शन घेणं शहाणपणाचं ठरेल.
advertisement
8/8
केस आणि नखे कापणे - अनेक जुन्या परंपरांमध्ये या दिवशी केस किंवा नखे कापणं अशुभ मानलं जातं. जरी ही वैयक्तिक श्रद्धेची गोष्ट असली, तरी परंपरेचा सन्मान करणं ही कुटुंबातील भावना जपण्यासारखं आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Holi 2026: होळीच्या रात्री लक्षात ठेवून करू नयेत अशा गोष्टी; नशिबाची साथ सुटते, कष्टाचं फळ शून्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल