TRENDING:

Cleaning Hacks : मार्बल टाइल्सवर रंगाचे डाग पडलेत? चिंता करू नका, 'या' युक्तीने चुटकीसरशी होतील साफ

Last Updated:
Post holi house cleaning hacks : होळी खेळल्यानंतर साहजिकच घर खराब होतंच. घराबाहेर होळी खेळली तरीही घरात काही प्रमाणात का होईना रंग येतोच. अशावेळी घरातील मार्बल टाईल्स मात्र खराब होतात. त्यांच्यावर डाग पडतात आणि मग हे डाग निघतील की नाही याची आपल्याला काळजी वाटत राहते. आज आम्ही तुम्हाला यावर काही सोपे उपाय सांगत आहोत.
advertisement
1/7
मार्बल टाइल्सवर रंगाचे डाग पडलेत? चिंता सोडा, 'या' युक्तीने चुटकीसरशी होतील साफ
घरातील मार्बलची फरशी घाण झाली की आपल्याला टेन्शन येतं. मात्र यावरचा रंग काढण्याचे काही सोपे मार्ग आहेत. ते वापरून तुम्ही घरातील फरशी आणि दोन फरश्यांमधला भागदेखील अगदी स्वच्छ करू शकता. मागे कोणताही डाग राहणार नाही. चला पाहूया ते उपाय.
advertisement
2/7
कोमट पाणी : कोणतेही डाग काढण्यासाठी आणि रंग काढण्यासाठी सर्वात आधी फरशी कोमट पाण्याने धुवा. ​​कोमट पाणी जमिनीवर टाका आणि शक्य असल्या हलके हलके घासून फर्शीवरचे रंग कधी. कोमट पाण्यामुळे बराचसा रंग सहज निघेल.
advertisement
3/7
मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा मार्बलच्या फरशीवर कधीही आम्लयुक्त उत्पादने म्हणजे आंबट पदार्थ किंवा द्रव वापरू नका. मार्बलवर व्हिनेगर, लिंबू किंवा आम्लयुक्त उत्पादने वापरण्यास मनाई असते.
advertisement
4/7
डिटर्जंट : मार्बलच्या फरशीवर घट्ट डाग पडले असेल तर कोमट पाण्यापेक्षा डिटर्जंटचा उपाय जास्त फायदेशीर असतो. चांगल्या दर्जाची डिटर्जंट पावडर घ्या ती पाण्यात मिसळवा. यामध्ये कापड किंवा पोछा बुडवा आणि त्याने फरशी घासून घ्या. नंतर ते स्वच्छ कापडाने पुसूनगया. हे दोन ते तीन वेळा करा. याने फरशीवरील रंग सहज निघेल.
advertisement
5/7
घरात इतर प्रकारची फारशी असले किंवा अंगणातील खरबडी फारशी साफ करायची असेल तर त्यासाठी व्हिनेगर वापरू शकता. व्हिनेगरमध्ये पाणी घालून ते पातळ करा आणि या पाण्यात एक कापड भिजवून फरशी घासून घ्या. यामुळे रंग सहज निघून जाईल.
advertisement
6/7
दोन टाइलच्यामधील भाग बेकिंग सोडा आणि व्हिनेगरने तुम्ही साफ करू शकता. दोन्ही अर्धे अर्धे मिसळून पेस्ट बनवा. ते दोन टाईल्सच्यामध्ये लावा आणि अर्धा तास राहू द्या. नंतर टूथब्रशने घासून घ्या. हे हॅक तुम्हाला तुमच्या टाइल्समधील डाग काढून टाकण्यास मदत करेल.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cleaning Hacks : मार्बल टाइल्सवर रंगाचे डाग पडलेत? चिंता करू नका, 'या' युक्तीने चुटकीसरशी होतील साफ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल