TRENDING:

Rashmika Mandana : एकीकडे विजयसोबत साखरपुडा, दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्यासोबत रश्मिकाचा रोमान्स, Bold Photo

Last Updated:
Rashmika Mandana : अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरू आहेत. एकीकडे साखरपुड्याच्या चर्चा तर दुसरीकडे रश्मिका बॉलिवूड अभिनेत्यासोबत रोमान्स करताना दिसतेय. दोघांचे फोटो समोर आलेत.
advertisement
1/9
एकीकडे विजयसोबत साखरपुडा, दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्यासोबत रश्मिकाचा रोमान्स
प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी गुपचूप साखरपुडा केला. या बातमीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. रश्मिका आणि विजय यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं.
advertisement
2/9
दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल आणि साखरपुड्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाहीये. दरम्यान रश्मिकाने साखरपुड्याच्या बातमीनंतर पहिली पोस्ट शेअर केली आहे. काय लिहिलंय रश्मिकाने तिच्या पोस्टमध्ये पाहूयात.
advertisement
3/9
मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिका आणि विजय यांनी 3 ऑक्टोबर 2025मध्ये हैद्राबादमध्ये साखरपुडा केला. यावेळी फक्त त्यांचे जवळचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक उपस्थित होते.
advertisement
4/9
साखरपुड्याच्या चर्चेनंतर चाहत्यांना रश्मिकाकडून काहीतरी खास पाहायची उत्सुकता होती. पण रश्मिकाने मात्र तिच्या पर्सनल लाइफबाबत नाहीतर तिच्या प्रोफेशनल लाइफबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
5/9
एकीकडे विजय देवरकोंडाबरोबर साखरपुड्याच्या चर्चा तर दुसरीकडे रश्मिका बॉलिवूड अभिनेत्याबरोबर रोमान्स करताना दिसतेय. रश्मिकाने तिच्या आगामी द गर्लफ्रेंड या सिनेमाचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यानंतर सिनेमातील गाण्याची झलक शेअर केली.
advertisement
6/9
तिने काही फोटो पोस्ट केलेत. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना तिच्याबरोबर दिसतोय. तिने पोस्टमध्ये लिहिलंय, "या गाण्यामागची कहाणी अशी आहे की आम्ही साधारण 10-12 दिवसांपासून एका अप्रतिम ठिकाणी शूटिंग करत होतो."
advertisement
7/9
"शेवटच्या दिवशी आमच्या प्रोड्युसर आणि डायरेक्टरना एक भन्नाट आयडिया सुचला. त्यांनी म्हटलं, थांबा, आपण इथे एक गाणं का शूट करत नाही? इतकी सुंदर लोकेशन आहे, मग का नाही? आणि मीही विचार केला, ‘का नाही?’ मग आम्ही साधारण 3-4 दिवसांत सगळं पूर्ण केलं आणि शेवटी जेव्हा हे गाणं तयार झालं, तेव्हा ते पाहून आम्ही सगळेच थक्क झालो."
advertisement
8/9
रश्मिकाचा आगामी द गर्लफ्रेंड हा सिनेमा राहुल रवींद्रन यांनी दिग्दर्शित केला आहे. यात रश्मिका सोबत अभिनेता धीक्षित शेट्टी झळकणार आहे.
advertisement
9/9
चित्रपटात नातेसंबंध आणि समजुतीचा शोध घेणारी एक सुंदर रोमँटिक कथा दाखवण्यात आली आहे. विजय देवरकोंडाने या सिनेमाला आपला आवाज दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rashmika Mandana : एकीकडे विजयसोबत साखरपुडा, दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्यासोबत रश्मिकाचा रोमान्स, Bold Photo
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल