Pune Weather : पुढील 24 धोक्याचे, पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यातून मान्सून परतीसाठी पोषक हवामान होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामानाची स्थिती कशी राहील पाहुयात.
advertisement
1/7

राज्यातून मान्सून परतीसाठी पोषक हवामान होत आहे. आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाच्या सरींची शाक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामानाची स्थिती कशी राहील पाहुयात.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात रविवारी पावसाची उघडीप राहिली. यावेळी 30 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. आज पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/7
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 30.6 अंश सेल्सिअस इतके राहीले. यावेळी पावसाची उघडीप राहिली. आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात काल रविवारी पावसाची उघडीप राहिली. आज कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 30 अंशावर राहिल. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाची उघडीप राहिली. 6 ऑक्टोबर रोजी सोलापूरमध्ये 30 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावससाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाची उघडीप राहिली. यावेळी कमाल तापमान 30.4 अंश सेल्सिअस इतके राहिले. पुढील 24 तासात जिल्ह्यात अंशत ढगाळ आकाशासह एक दोन वेळा गडगडाटाची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता पुढील 24 तासासाठी वर्तवण्यात आली आहे.काही ठिकाणी ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची नोंद होईल. मुख्यतः तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पावसाची उघडीप शेतीच्या कामांना, वाचलेल्या पिकांच्या काढणीला उपयोगी ठरत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Weather : पुढील 24 धोक्याचे, पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट