TRENDING:

Weather Alert: 48 तास धोक्याचे, वादळी पाऊस, गारपीट अन् ..., महाराष्ट्रावर तिहेरी संकट, 21 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून उष्णतेच्या लाटेनंतर वादळी पाऊस आणि गारपिटीचा धोका वाढला आहे.
advertisement
1/7
48 तास धोक्याचे, वादळी पाऊस, गारपीट अन् ..., महाराष्ट्रावर तिहेरी संकट, 21 जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रावर ऐन उन्हाळात अस्मानी सकंट धुमशान घालत आहे. मंगळवारी राज्याला उष्णतेची लाट, गारपीट, तर काही ठिकाणी वादळी पाऊस अशा तिहेरी संकटानं घेरलं. आज पुन्हा विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. पुढील 48 तास धोक्याचे असून 21 हून अधिक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 18 मार्च रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
विदर्भावर पुढील काही दिवस अवकाळी संकट घोंघावत आहे. आज ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच मेघगर्जना, विजा आणि वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. 7 जिल्ह्यांना पुढील 48 तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/7
मराठवाड्यात तुरळख ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा सुटेल. तापमानात काही प्रमाणात घट झाली असली तरी उन्हाचे चटके कायम आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.
advertisement
4/7
मध्य महाराष्ट्रात देखील वादळी पावसाची शक्यता आहे. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यांत ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह हलका ते मध्यम पाऊस होईल. पुढील 24 तासांत वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून 48 तासांसाठी सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यांत देखील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. हवामान ढगाळ राहणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे. तर 19 मार्च रोजी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
6/7
मुंबईसह कोकणात देखील हवापालट झाली आहे. उष्ण आणि दमट हवामानाचा संकट टळलं आहे. तर आता अस्मानी संकटाने डोके वर काढलं आहे. आज ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पाऊस होईल. रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना 48 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईत 31-33 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील. तसेच 2 दिवस हलका पाऊस होईल.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यातील उष्णतेच्या लाटेचा जोर काही भागात ओसरला असला तरी उन्हाचे चटके कायम आहेत. वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तसेच गहू, हरभरा, ज्वारी, फळबागा यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची आणि फळबागांची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: 48 तास धोक्याचे, वादळी पाऊस, गारपीट अन् ..., महाराष्ट्रावर तिहेरी संकट, 21 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल