बाकी मला काही नको..! रिंकूला हवाय Prime Video च्या या वेब सीरिजमधल्या हिरोसारखा नवरा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री रिंकू राजगुरूशी लग्न करायला अनेक तरुण उत्सुक आहेत. पण तिला कोणाशी करायचंय लग्न? तिला कसा नवरा पाहिजे?
advertisement
1/8

सध्या वेब सीरिजचा जमाना असून तरुण प्रेक्षकांसाठी हे मनोरंजनाचे मुख्य माध्यम बनलं आहे. वेब सीरिजमधील कथानक, पात्रे आणि संवाद तरुणांना अधिक खरे आणि आपली वाटत आहेत. त्यामुळे ओटीटी, वेब सीरिजकडे तरुण खूप आकर्षला जात आहे.
advertisement
2/8
मलाही या हिरोसारखा नवरा आहे असं अनेक मुली सहज बोलून जातात. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरूची देखील अशीच अवस्था आहे. रिंकू देखील वेब सीरिजची दिवानी असून तिला एका प्रसिद्ध वेब सीरिजमधील हिरोसारखा नवरा हवा असल्याचं तिनं स्वत: सांगितलं आहे.
advertisement
3/8
रिंकू गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. तिचा ब्रेकअप झाल्याचं तिनं कबूल केलं आहे. रिंकूला कसा नवरा हवा आहे हे देखील तिनं सांगितलं आहे. रिंकूला एका फेमस वेब सीरिजमधील हिरोसारखा नवरा हवा आहे. तसा नवरा मिळाला तर तिला बाकी काही नको असंही ती म्हणाली.
advertisement
4/8
राजश्री मराठीच्या मुलाखतीत बोलताना रिंकूने सांगितलं की, तिला प्राइम व्हिडीओच्या द फॅमिली मॅन या हिट सीरिजमधील हिरोसारखा नवरा पाहिजे.
advertisement
5/8
रिंकु म्हणाली, "मला जोडीदार हा 'फॅमिली मॅन'सारखा हवा आहे. माझ्या जोडीदाराला कुटुंब महत्त्वाचं असेल ज्याला माणसाची कदर असेल. महत्त्वाचं म्हणजे तो फक्त आणि फक्त माझा असावा. बाकी मला काही नको."
advertisement
6/8
'द फॅमिली मॅन' ही वेब सीरिज थ्रिलर-ड्रामा आहे. अभिनेता मनोज वाजपेयी यानं श्रीकांत तिवारी ही भूमिका साकारली आहे. श्रीकांत हा सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचा नवरा आणि पिता असतो. पण त्याचबरोबर तो गुप्तचर (स्पाय) एजंट म्हणूनही काम करतो.
advertisement
7/8
त्याला देशाची सेवा करताना तसेच घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना अनेक गुंतागुंतीच्या परिस्थितींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रेक्षकांना त्याचा हिरोचा अवतार पण आवडतो.
advertisement
8/8
'द फॅमिली मॅन'चे आतापर्यंत तीन सीझन आलेत. तिन्ही सीझन प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेत. श्रीकांत तिवारीला पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक पसंती देत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बाकी मला काही नको..! रिंकूला हवाय Prime Video च्या या वेब सीरिजमधल्या हिरोसारखा नवरा