'तो सर्वात चांगला निर्णय...' लग्नाआधी अनेक वर्ष लिव्ह इन मध्ये राहायचं सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम जोडपं
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्यांसोबत गायकही कायम सगळ्यांमध्ये चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सेलिब्रिटी गायकांच्या जोडीविषयी सांगणार आहोत. या दोघांची पहिली भेट सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या मंचावर झाली होती. त्यानंतर ते प्रेमात पडले आणि लग्न केलं. पण लग्नाआधी हे जोडपं अनेक वर्ष लिव्ह इन मध्ये राहायचं असा खुलासा या जोडप्यानं केला आहे.
advertisement
1/8

हे सेलिब्रिटी जोडपं आहे रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे हे दोघंही घराघरांत लोकप्रिय झाले.
advertisement
2/8
हा शो संपल्यावर काही वर्षांनी रोहित-जुईली एकमेकांचे चांगले मित्र झाले. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
3/8
रोहित-जुईलीने दोन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. पण त्याआधी ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. नुकतंच या जोडप्यानं हा खुलासा केला आहे. तसंच त्यांनी हा निर्णय का घेतला होता याचं कारणंही सांगितलं आहे.
advertisement
4/8
नुकतंच या जोडप्यानं लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यात लिव्ह इन विषयी बोलताना रोहित म्हणाला, 'आम्ही लग्नाचा निर्णय घरच्यांना सांगितला. पण त्याआधी आम्हाला दोघांना एकत्र वेळ घालवण्याची गरज आहे असं वाटू लागलं. कारण आम्ही मुंबईत एकमेकांपासून खूप दूर राहायचो. त्यामुळं आम्हाला जास्त वेळ एकत्र मिळायचा नाही.'
advertisement
5/8
'लग्नाआधी एकमेकांच्या सवयी, आवडी निवडी माहित असायला हव्यात, त्याचा आपल्या नात्यावर काही परिणाम होतो का? हे देखील आमच्यासाठी महत्वाचं होतं. त्यानंतर आम्ही लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही घरच्यांना तसं सांगितलं.'
advertisement
6/8
रोहित पुढे म्हणाला, 'त्यांना आधी ते पटलं नाही, पण नंतर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. तो आमच्या आयुष्यातला सर्वात बेस्ट निर्णय होता.' असा खुलासा रोहितने केला आहे.
advertisement
7/8
तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यामुळे नातेवाईकांनी ट्रोल केल्याचंही खुलासा जुईलीने केला आहे. ती म्हणाली, 'आम्हाला दोघांना एकत्र कोव्हिडची लागण झाली होती. त्यावेळी सगळ्यांना आम्ही एकत्र राहत असल्याचं समजलं होतं. आमच्या आई-बाबांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या. परंतु, त्या क्षणाला आम्हाला याबाबत आमच्या उर्वरित कुटुंबाला सुद्धा सांगावं लागणार होतं. तेव्हा याचे बाबा, माझे आई-बाबा आमच्या पाठिशी खूप खंबीरपणे उभे राहिले.'
advertisement
8/8
रोहित आणि जुईलीने 2वर्ष लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर 23 जानेवारी 2022 रोजी लग्नगाठ बांधली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तो सर्वात चांगला निर्णय...' लग्नाआधी अनेक वर्ष लिव्ह इन मध्ये राहायचं सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम जोडपं