TRENDING:

ऐश्वर्याला लग्नाचं मागणं घालणं पडलं महागात, भडकलेल्या सलमानने हॉटमेल को-फाउंडरसोबत जे केलं... ऐकून हादरून जाल

Last Updated:
जगातील प्रसिद्ध 'हॉटमेल' या ईमेल सेवेचे को-फाउंडर सबीर भाटिया यांना एकदा बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे जाहीर कौतुक करणे खूपच महागात पडले होते.
advertisement
1/8
ऐश्वर्याला लग्नाचं मागणं घातलं, भडकलेल्या सलमानने हॉटमेल को-फाउंडरसोबत जे केलं..
मुंबई: सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं प्रेमप्रकरण हे बॉलिवूडमधील सर्वांत जास्त गाजलेल्या आणि वादग्रस्त प्रकरणांपैकी एक आहे. त्याची झळ विवेक ऑबेरॉयलाही बसली होती अशातच जगातील प्रसिद्ध 'हॉटमेल' या ईमेल सेवेचे को-फाउंडर सबीर भाटिया यांना एकदा बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे जाहीर कौतुक करणे खूपच महागात पडले होते.
advertisement
2/8
ऐश्वर्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे त्यांचा थेट सुपरस्टार सलमान खान याच्याशी एका पार्टीत मोठा वाद झाला होता आणि रागाच्या भरात सलमानने भाटिया यांच्यावर सिगारेट लावल्याची चर्चा पसरली होती.
advertisement
3/8
ऐंशी-नव्वदच्या दशकात 'हॉटमेल'मुळे जगभरात ओळख मिळवलेल्या सबीर भाटिया यांनी एकदा ऐश्वर्या रायबद्दल आपले आकर्षण जाहीर केले होते. त्यांनी उघडपणे ऐश्वर्यावर असलेल्या आपल्या प्रेमाची कबुली दिली होती, तसेच तिच्याशी लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्यांच्या या थेट प्रपोझलमुळे त्या काळात चांगलीच खळबळ माजली होती.
advertisement
4/8
टाइम्स ऑफ इंडियाच्या २००१ मधील एका रिपोर्टनुसार, सबीर भाटिया यांनी ऐश्वर्याबद्दल व्यक्त केलेली ही भावना सुपरस्टार सलमान खानला आवडली नव्हती. याच कारणामुळे, २००१ मध्ये एका पार्टीत सलमान खानने कथितरित्या सबीर भाटिया यांच्याशी थेट पंगा घेतला.
advertisement
5/8
सलमान खान भाटिया यांच्याकडे गेले आणि थेट विचारले, "तर तो तूच आहेस, ज्याला ऐश्वर्याशी लग्न करायचे आहे?" या वक्तव्यामुळे पार्टीतील वातावरण तणावपूर्ण झाले होते. भाटिया यांनी तेव्हा प्रसारमाध्यमांनी पसरवलेली ही निव्वळ अफवा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.
advertisement
6/8
या रिपोर्टमध्ये पुढे दावा करण्यात आला होता की, फोटोंसाठी पोझ देत असताना सलमान खान सबीर भाटिया आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका महिलेच्या मध्ये आले. त्यावेळी सलमानने त्या महिलेला मिठी मारली होती.
advertisement
7/8
याच गडबडीत सलमान खान यांनी त्यांच्या हातात असलेली सिगारेटची राख कथितरित्या सबीर भाटिया यांच्या हातावर झटकली. भाटिया यांनी लगेच ती राख झटकली असता, सलमान खान यांनी मस्करी करत म्हटले, "उफ्फ, अखेर तुमच्या हातावर राख लागलीच!" सलमानच्या या क्रियेमुळे आणि प्रतिक्रियेमुळे पार्टीतील अनेक लोक तेव्हा चकित झाले होते.
advertisement
8/8
सलमान आणि ऐश्वर्याचे नाते २००२ मध्ये तुटले होते. त्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले, तर सलमान खानने आजही लग्न केलेले नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऐश्वर्याला लग्नाचं मागणं घालणं पडलं महागात, भडकलेल्या सलमानने हॉटमेल को-फाउंडरसोबत जे केलं... ऐकून हादरून जाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल