TRENDING:

Wine Fact : वाइन कधीच खराब होत नाही असं तुम्ही पण आतापर्यंत समजत होतात का? थांबा हे कसं ओळखायचं आधी जाणून घ्या

Last Updated:
वाईन जितकी जुनी तितकी तिची चव चांगली आणि ते बरोबर देखील आहे. पण याचा अर्थ असा नाही की वाईन कधीच खराब होत नाही. वाईन देखील खराब होते. हे त्याची चव आणि टेक्चरवरुन कळतं. पण अनेकांना याची माहिती नसल्यामुळे ओळखता येत नाही.
advertisement
1/7
वाइन कधीच खराब होत नाही तुम्ही पण असंच समजता? थांबा हे कसं ओळखायचं जाणून घ्या
वाइनबद्दल अनेकांना काही गैरसमज आहेत. असं म्हणतात की वाईन जितकी जुनी तितकी तिची चव चांगली आणि ते बरोबर देखील आहे. पण याचा अर्थ असा नाही की वाईन कधीच खराब होत नाही. वाईन देखील खराब होते. हे त्याची चव आणि टेक्चरवरुन कळतं. पण अनेकांना याची माहिती नसल्यामुळे ओळखता येत नाही.
advertisement
2/7
अनेकांना वाटतं की वाइन जितकी जुनी, तितकी चांगली. पण हे नेहमीच खरं नसतं. काही वाइन काळानुसार अजून मऊ, समृद्ध आणि स्वादिष्ट बनतात, तर काहींचा स्वाद आणि सुगंध बिघडतो. अशा वेळी लोक गोंधळतात. "ही वाइन एक्सपायर झाली का?" किंवा "तिचा स्वाद असा का वाटतोय?" याच प्रश्नांची उत्तरे वाइन एक्सपर्ट सोनल हॉलंड यांनी दिली आहेत. त्यांच्यानुसार वाइन खराब झाली आहे की नाही हे ओळखणं कठीण नाही, फक्त काही लक्षणं लक्षात ठेवावी लागतात.
advertisement
3/7
वाइन खराब का होते?सोनल हॉलंड सांगतात की वाइन अनेक कारणांनी खराब होऊ शकते. जर वाइन थेट सूर्यप्रकाशात आली, तर तिच्या आत रासायनिक प्रतिक्रिया होतात आणि तिचा स्वाद बदलतो. हवेचा संपर्क आला की वाइनचा फ्लेवर बिघडतो आणि ऑक्सिडेशन सुरू होतं. चुकीच्या तापमानात साठवणही वाइनचं नुकसान करतं. म्हणून वाइन योग्य जागी, नियंत्रित तापमानात आणि बंद बाटलीत साठवणं खूप गरजेचं असतं.
advertisement
4/7
रंगावरून ओळखा वाइन खराब झाली आहे कारंगात झालेला बदल हा सर्वात मोठा संकेत असतो. जर रेड वाइनचा रंग भुरकट दिसत असेल किंवा व्हाईट वाइनचा रंग पिवळसर झाला असेल, तर समजा वाइन खराब झाली आहे. हे ऑक्सिडेशनमुळे होतं. अगदी तसं, जसं आपण सफरचंद कापल्यावर काही वेळानं ते तपकिरी होतं.
advertisement
5/7
सुगंधात बदल मोठं लक्षणताजी वाइन नेहमीच फ्रेश आणि फळांच्या सुगंधासारखी वाटते. पण जर वाइनचा सुगंध बदलला, मंद झाला किंवा विचित्र वाटला तर ती वाइन आता पूर्वीसारखी राहिलेली नाही.
advertisement
6/7
व्हिनेगर किंवा नेल पॉलिश रिमूव्हरसारखी गंध? सावधानजर वाइनमधून सिरका किंवा नेल पॉलिश रिमूव्हरसारखी गंध येत असेल, तर याचा अर्थ तिच्या आत बॅक्टेरिया वाढले आहेत.अशी वाइन पिण्यास अयोग्य असते आणि आरोग्यासही हानीकारक ठरू शकते.
advertisement
7/7
वाइनचा रंग, सुगंध आणि चव. हे तीन संकेत तुम्हाला सहज सांगतील की ती वाइन अजून फ्रेश आहे की आता तिला “गुडबाय” म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी वाइनची बाटली उघडण्यापूर्वी, ही लक्षणं नक्की लक्षात ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Wine Fact : वाइन कधीच खराब होत नाही असं तुम्ही पण आतापर्यंत समजत होतात का? थांबा हे कसं ओळखायचं आधी जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल