6 बॉयफ्रेंड, मोडलेला साखरपुडा, Ex BF ने केले होते चीटिंगचे आरोप; प्रसिद्ध अभिनेत्री 40 व्या वर्षी चढणार बोहोल्यावर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Hindi TV Actress Getting Married : तब्बल ६ जणांना डेट केल्यानंतर आणि एका तुटलेल्या साखरपुड्यानंतर, ३९ वर्षांच्या अभिनेत्रीला अखेर तिचा जोडीदार मिळाला आहे.
advertisement
1/9

तब्बल ६ जणांना डेट केल्यानंतर आणि एका तुटलेल्या साखरपुड्यानंतर, ३९ वर्षांच्या पवित्राला अखेर तिचा जोडीदार मिळाला आहे. तिने गुपचूप आपल्या बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा उरकून घेतला असून ही आनंदाची बातमी स्वतः चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
advertisement
2/9
पवित्रा पुनियाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर साखरपुडा आणि प्रपोजलचे काही भावनिक फोटो पोस्ट करून चाहत्यांना मोठे सरप्राइज दिले आहे. या फोटोंमध्ये तिला तिचा बॉयफ्रेंड प्रपोज करताना दिसत आहे.
advertisement
3/9
विशेष म्हणजे, पवित्राने या फोटोंमध्ये स्वतःचा आणि बॉयफ्रेंडचा चेहरा पूर्णपणे लपवला आहे. फक्त त्यांच्या हातात घातलेल्या अंगठ्या आणि रोमँटिक पोज दिसत आहेत. फोटोंवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
advertisement
4/9
पवित्राने फोटोंसोबत एक कॅप्शन लिहिले आहे, ज्यामुळे लवकरच तिच्या दुसऱ्या लग्नाची शक्यता वर्तवली जात आहे. तिने लिहिले आहे की, ती लवकरच 'NS' ची मिसेस बनणार आहे. 'NS' हे तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या नावाचे इनिशियल्स असू शकतात.
advertisement
5/9
पवित्रा पुनियाची लव्ह लाईफ नेहमीच वादग्रस्त आणि चढ-उतारांनी भरलेली राहिली आहे. तिने यापूर्वी अनेक अभिनेते आणि एका बिझनेसमनला डेट केले आहे.
advertisement
6/9
'बिग बॉस'च्या घरातून तिचे आणि अभिनेता एजाज खानचे रिलेशनशिप खूप गाजले होते आणि शो नंतरही ते अनेक वर्षे टिकले, पण अखेर त्यांचा ब्रेकअप झाला.
advertisement
7/9
एजाज खानच्या आधी पवित्राचे नाव प्रतीक सहजपाल, पारस छाबड़ा आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतही जोडले गेले होते.
advertisement
8/9
याशिवाय, तिने बिझनेसमॅन सुमित माहेश्वरी याच्यासोबत साखरपुडाही केला होता, जो नंतर तुटला. सुमितने तर पवित्रावर चार वेळा चीट केल्याचा आरोपही केला होता.
advertisement
9/9
या सर्व वादग्रस्त टप्प्यांनंतर, आता ३९ व्या वर्षी पवित्रा पुनियाने एका नवीन नात्याला सुरुवात केली असून, लवकरच ती लग्न करेल, अशी अपेक्षा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
6 बॉयफ्रेंड, मोडलेला साखरपुडा, Ex BF ने केले होते चीटिंगचे आरोप; प्रसिद्ध अभिनेत्री 40 व्या वर्षी चढणार बोहोल्यावर