समीर चौघुले-सई ताम्हणकरच्या मुरलेल्या प्रेमाचा 'गुलकंद', थिएटरमध्ये बघायचा राहून गेला? या OTTवर झालाय रिलीज
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Gulkand Marathi Movie on OTT : महाराष्ट्राची हास्यजत्राची कमाल स्टारकास्ट असलेला गुलकंद हा सिनेमा 1 मे रोजी रिलीज झाला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. सिनेमात आता ओटीटीवर रिलीज झाला आहे.
advertisement
1/7

1 रोजी रिलीज झालेला गुलकंद या सिनेमानं देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. कॉमेडी, रोमान्स आणि इमोशन्सने भरलेल्या या सिनेमानं प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं.
advertisement
2/7
हास्यजत्रेची कमाल स्टारकास्ट असलेला हा सिनेमा थिएटरमध्ये बघायचा राहून गेलाय का? आता काळजी करू नका कारण तुम्ही तो घरबसल्या पाहू शकता.
advertisement
3/7
सई ताम्हणकर, समीर चौघुले पहिल्यांदाच मोठ्या स्क्रीनवर एकत्र दिसले आहेत.त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. तर प्रसाद ओक आणि ईशा डे यांनीही सिनेमात सॉलिड धमाल आणली आहे.
advertisement
4/7
मुरलेल्या नात्यांचा हा गुलंकद घरबसल्या पाहण्यासाठी तुम्हाला अमेझॉन प्राइमवर जावं लागणार आहे. गुलकंद हा सिनेमा अमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे.
advertisement
5/7
पण अमेझॉन प्राइमवर हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. सिनेमा ऑन रेंट रिलीज झाला आहे.
advertisement
6/7
सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटर हाऊसफुल केले होते.
advertisement
7/7
सिनेमाचं लेखन दिग्दर्शन हे सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी केलं होतं. सिनेमात अभिनेत्री जुई भागवत, तेजस राऊत, वनिता खरात हे कलाकार महत्त्वाच्या भुमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
समीर चौघुले-सई ताम्हणकरच्या मुरलेल्या प्रेमाचा 'गुलकंद', थिएटरमध्ये बघायचा राहून गेला? या OTTवर झालाय रिलीज