TRENDING:

ना अ‍ॅम्बुलन्स, ना व्हिलचेअर, क्रिटिकल सर्जरीनंतर चालत कसा काय आला? हल्ल्याच्या 10 महिन्यांनी अखेर सैफचा खुलासा

Last Updated:
Saif Ali Khan on Attack : सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला, पाठीत चाकू लागला, सर्जरीनंतर तो फिट दिसला. पण त्याला त्यावरून प्रचंड ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलिंगवर सैफनं अखेर मौन सोडलं.
advertisement
1/10
ना अ‍ॅम्बुलन्स, ना व्हिलचेअर, क्रिटिकल सर्जरीनंतर सैफ चालत कसा काय आला?
अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. सैफच्या घरी अज्ञात व्यक्ती शिरली आणि त्याने  हल्ला केला. यात सैफ गंभीर जखमी झाला.
advertisement
2/10
हल्लेखोराने त्याच्या पाठीत चाकू खुपसला होता. त्यानंतर सैफवर सर्जरी करण्यात आली. या घटनेतंर सैफचे चाहते प्रचंड घाबरले होते.
advertisement
3/10
पण सर्जरीनंतर सैफ जेव्हा घरी आला तेव्हा मात्र तो फिट दिसला. गाडीतून उतरून तो व्यवस्थित चालताना दिसला.
advertisement
4/10
यानंतर मात्र सैफची सर्जरी आणि त्याच्यावर झालेला हल्ल्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. हल्ल्याच्या 10 महिन्यांनी अखेर सैफने यावर मौन सोडलं आहे. 
advertisement
5/10
काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल खन्न' शोमध्ये सैफ अली खानने हजेरी लावली होती. त्याच्यावर झालेला हल्ला हा सोशल मीडियावर अनेक लोकांनी खोटा असल्याचा दावा केला, यावर तुझं काय मत आहे? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. 
advertisement
6/10
काजोलने सैफला सांगितले, "त्या वेळी मी तुझा गाडीतून पळत जातानाचा व्हिडीओ पाहिला. मी खूप घाबरले होते."
advertisement
7/10
  हे ऐकून सैफने उत्तर दिले, "त्या वेळी सर्वांना हे कसे घडले हे जाणून घ्यायचं होतं. लोकांचा आणि माध्यमांचा उत्साह पाहून मला वाटलं की मी चालत जावं. मी चालत असल्यानं मी ठीक होतो. त्यानंतर मी एक आठवडा तिथेच राहिलो. पण चालणे वेदनादायक होतं, मला व्हीलचेअरची गरज नव्हती."
advertisement
8/10
सैफ अली खानने पुढे स्पष्ट केले की, "त्यावेळी तो चालण्याच्या स्थितीत होता. मी अॅम्ब्युलन्सचा किंवा व्हीलचेअरचा वापर केला असता तर लोकांचं टेन्शन वाढलं असतं."
advertisement
9/10
"मी ठीक आहे असा मेसेज मला सगळ्यांना द्यायचा होता म्हणून चालत आलो. उगाच सगळ्यांना अनावश्यक त्रास का द्यावा? मी त्यांच्याबद्दल विचार केला नसता तर ते घाबरले असते." 
advertisement
10/10
इतकी गंभीर इजा झाल्यानंतरही सैफ व्यवस्थित चालक आला यावरूनही त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावर सैफ म्हणाला, "लोक असा विचार का करतात हे मला समजलेलं नाही." 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना अ‍ॅम्बुलन्स, ना व्हिलचेअर, क्रिटिकल सर्जरीनंतर चालत कसा काय आला? हल्ल्याच्या 10 महिन्यांनी अखेर सैफचा खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल