समांथाचा दुसऱ्या लग्नातही विश्वासघात? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी समोर आली धक्कादायक माहिती
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने 1 डिसेंबर रोजी राज बरोबर लग्न केलं. पण लग्नाच्या एक दिवसानंतरच समांथाच्या नवऱ्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
advertisement
1/9

साऊथ अभिनेत्री आणि नॅशनल क्रश समांथा रूथ प्रभूने तिचा बॉयफ्रेंड आणि चित्रपट निर्माते राज निदिमोरूशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. दोघांनी 1 डिसेंबर रोजी कोइम्बतूरमधील ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात साध्या पद्धतीनं लग्न केलं.
advertisement
2/9
लग्नानंतर समांथा आणि राजनं फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी सगळ्यांना दिली. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
advertisement
3/9
राजबरोबर समांथाचं हे दुसरं लग्न आहे. राजचंही समांथाबरोबर हे दुसरं लग्न आहे. दोघांच्या लग्नाची माहिती समोर आल्यानंतर एका बातमीचं चांगलीच खळबळ उडवली आहे. राजने पहिल्या बायकोला डिवोर्स न देता समांथाशी लग्न केल्याचं बोललं जात आहे.
advertisement
4/9
समांथा आणि राज दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. समांथाचे पहिले लग्न अभिनेता नागा चैतन्यसोबत झालं होतं. 4 वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. दुसरीकडे राजचं लग्न श्यामली डे सोबत झालं होतं. पण राज किंवा श्यामली, या दोघांपैकी कुणीही त्यांच्या घटस्फोटाबद्दल उघडपणे बोललेलं नाही.
advertisement
5/9
समांथा आणि राज यांचं लग्न झाल्यानंतर राजची एक्स बायको श्यामली डेची एक जुनी पोस्ट व्हायरल होतेय. 5 दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये एका महिलेच्या भांगात कुंकू भरलेला होता. तिच्या कपाळावर एक मोठा कुंकवाचा टिळा होता.
advertisement
6/9
श्यामलीने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, "आपलं नातं, मग ते पती-पत्नी असोत, मुले असोत किंवा प्राणी असोत, हे सर्व आपल्या भूतकाळातील कृतींचे परिणाम आहेत. या आयुष्यात देवाणघेवाण पूर्ण झाली की नातीही संपतात."
advertisement
7/9
श्यामलीची ही पोस्ट तिची मैत्रिणी भावना तपारिया हिने पुन्हा शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिलंय, "मला विचारणाऱ्यांसाठी सांगते, शेवटच्या वेळी मी चेक केलं होतं तेव्हा ती विवाहित होती, आणि ती शेवटची वेळ आजही बदललेली नाही."
advertisement
8/9
भावनाने शेअर केलेल्या या पोस्टखालील कमेंट सेक्शन बंद केलं आहे. त्यामुळे तिचं हे विधान चर्चेत आलं आहे. राज निदिमोरूने समंथाशी लग्न करण्यापूर्वी श्यामली डेला डिवोर्स दिला होता असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
advertisement
9/9
श्यामलीच्या इन्स्टाग्रामवरही दोघांचे जुने फोटो पाहायला मिळत आहेत. भारतीय कायद्यापासून पहिल्या पत्नीला डिवोर्स दिल्याशिवाय दुसरं लग्न करण्यास परवानगी नाही. समांथाचं पहिलं लग्न देखील विश्वासघातामुळे मोडलं असं म्हटलं जात. आता दुसऱ्या लग्नातही समांथाचा विश्वास घात झाला का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
समांथाचा दुसऱ्या लग्नातही विश्वासघात? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी समोर आली धक्कादायक माहिती