TRENDING:

पहिल्या पत्नीचा मृत्यू, तर दुसरीनं दिला धोका; या अभिनेत्यानं 19 वर्षांनी लहान मुलीशी केलं तिसरं लग्न

Last Updated:
बॉलीवूडमध्ये कोणाचं कधी जुळेल आणि कोणाचं नातं कधी तुटेल काही सांगता येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्याविषयी सांगणार आहोत, ज्यानं आयुष्यात तीनदा लग्नगाठ बांधली. पण याचसोबत त्यानं अनेक आघाडीच्या अभिनेत्रींना डेट केलं होतं. या अभिनेत्यानं स्वतः याविषयी खुलासे केले आहेत. कोण आहे हा अभिनेता जाणून घ्या.
advertisement
1/7
पहिल्या पत्नीचा मृत्यू, दुसरीनं दिला धोका; अभिनेत्यानं या मुलीशी केलं तिसरं लग्न
या स्टारच्या कारकिर्दीतील पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला आणि तो रातोरात स्टार झाला. हा अभिनेता म्हणजे संजय दत्त. संजय दत्तचं वैयक्तिक आयुष्य कायम वादातीत राहीलं आहे. तो हळूहळू ड्रगच्या आहारी जाऊ लागला. त्या काळात त्यांचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेलं. संजय दत्तच्या बायोपिक 'संजू'नुसार, त्यानं आयुष्यात 308 महिलांना डेट केलं आहे.
advertisement
2/7
संजय दत्तने 1987 मध्ये मॉडेल रिचा शर्मासोबत लग्न केलं. लग्नानंतर लगेचच ऋचाला कॅन्सर झाला ज्यातून ती सावरली नाही आणि वयाच्या 32 व्या वर्षी तिने जगाचा कायमचा निरोप घेतला.
advertisement
3/7
कॅन्सरने त्रस्त असलेल्या या अभिनेत्रीला जेव्हा तिच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळाली तेव्हा ती उद्ध्वस्त झाली. 1996 मध्ये या आजाराशी लढताना रिचाचा मृत्यू झाला. तिच्यापासून संजय दत्तला एक मुलगी आहे जिचं नाव त्रिशला दत्त आहे. रिचा शर्माने 'सडक छप', 'हम नौजवान', 'आग ही आग', 'इन्साफ की आवाज' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
advertisement
4/7
ऋचा शर्माच्या निधनानंतर दोन वर्षांनी संजय दत्तने 1998 मध्ये मॉडेल रिया पिल्लईशी दुसरं लग्न केलं. पण संजय दत्तसोबत संसार करताना रियाच्या आयुष्यात दुसरं प्रेमाची एंट्री झाली.
advertisement
5/7
रिया पिल्लई लिएंडर पेसला डेट करत होती. तिने 2008 मध्ये अभिनेत्याशी घटस्फोट घेतला. रिया आणि लिएंडर 15 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि या नात्यातून दोघांना अयाना पेस ही मुलगी आहे.
advertisement
6/7
रियाने विश्वासघात केल्यावर मान्यताने संजय दत्तच्या आयुष्यात प्रवेश केला. आपल्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर, 'खलनायक' अभिनेत्याने मान्यतासोबत तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मान्यता संजयपेक्षा तब्बल 19 वर्षांनी लहान होती.
advertisement
7/7
मान्यता आणि संजय दत्त यांनी लग्नाच्या 2 वर्षानंतर त्यांना जुळी मुलं झाली. तिसऱ्या लग्नानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण मान्यता नेहमीच त्याच्यासोबत ठामपणे उभी राहिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पहिल्या पत्नीचा मृत्यू, तर दुसरीनं दिला धोका; या अभिनेत्यानं 19 वर्षांनी लहान मुलीशी केलं तिसरं लग्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल