TRENDING:

पहिल्या भेटीत प्रेम, 2 वेळा नकार, तिसऱ्या भेटीत काय घडलं ज्यामुळे सतीश शाहांच्या आयुष्यात आली त्यांची 'लकी चार्म'!

Last Updated:
Satish Shah : लोकप्रिय अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. तसेच त्यांची लव्हस्टोरीदेखील खूपच फिल्मी होती.
advertisement
1/5
तिसऱ्या भेटीत काय घडलं ज्यामुळे सतीश शाहांच्या आयुष्यात आली त्यांची 'लकी चार्म'!
सतीश शाह यांनी वयाच्या 74 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. भारतीय टेलिव्हिजनमधील सर्वात प्रतिभाशाली आणि बहुमुखी कलाकारांपैकी ते एक होते. जबरदस्त कॉमिक टायमिंगसाठी ते ओळखले जात. ‘जाणे भी दो यारों’ या विनोदी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांची ‘साराभाई वर्सेस साराभाई’ ही मालिका सर्वाधिक चर्चेत राहिली. सतीश शाह यांनी पत्नीला वेळ देता येतील अशीच कामे निवडण्यावर पसंती दर्शवली.
advertisement
2/5
सतीश शाह अभ्यासातही हुशार होते. पण मस्तीदेखील भरपूर करत असे. सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांना अभिनयाची आवड लागली. त्यानंतर त्यांनी एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला. थिएटर करत असतानाच त्यांना ‘ये जो है जिंदगी’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ‘साथ साथ’ या चित्रपटात त्यांना एक छोटी भूमिका मिळाली. या चित्रपटात फारुख शेख, दीप्ती नवल आणि नीना गुप्ता महत्त्वाच्या भूमिकेत होते.
advertisement
3/5
सतीश शाह आणि मधु यांची पहिली भेट 'सिप्टा फिल्म फेस्टिव्हल'मध्ये झाली होती. पहिल्या भेटीतच सतीश मधु यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी प्रपोज केलं. त्यावेळी मधु यांनी सतीश यांना नकार दिला होता. नकार मिळाल्याचं सतीश यांना प्रचंड वाईट वाटलं होतं.
advertisement
4/5
त्यानंतर एसएनडीसीमध्ये 'साथ साथ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सतीश आणि मधु यांची पुन्हा भेट झाली. त्यावेळी मधु त्याच कॉलेजमध्ये शिकत होत्या. सतीश यांना पुन्हा प्रयत्न करत मधु यांना पुन्हा विचारलं. पण दुसऱ्यांदाही मधु यांनी सतीश यांना रिजेक्ट केलं.
advertisement
5/5
सतीश आणि मधु यांनी पुन्हा एकदा भेट झाली. त्यावेळी सतीश यांनी विचारलं असता मधु यांनी उत्तर दिलं की,"माझ्या पालकांना भेटा. त्यांची परवानगी मिळाल्यावरच लग्न शक्य आहे".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पहिल्या भेटीत प्रेम, 2 वेळा नकार, तिसऱ्या भेटीत काय घडलं ज्यामुळे सतीश शाहांच्या आयुष्यात आली त्यांची 'लकी चार्म'!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल