शाहरुख खानची मार्कशीट व्हायरल, अर्थशास्त्रात 92, गणितात किती? तुम्हीच पाहा PHOTOS
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Shah Rukh Khan Marksheet Viral : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची मार्कशीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. फक्त देशातच नव्हे तर परदेशातही शाहरुखच्या स्टारडमची चर्चा आहे. अनेक वर्षांपासून तो इंडस्ट्रीवर रोमान्स किंग म्हणून राज्य करत आहे. आज बॉलिवूड गाजवणारा शाहरुख खान अभ्यासात किती हुशार होता हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/7
शाहरुख खानचं शिक्षण दिल्लीतील हंसराज कॉलेजमध्ये झालं आहे. सध्या त्याची एक जुनी कॉलेज मार्कशीट व्हायरल होत आहे. या मार्कशीटमधील नंबर पाहून चाहते शॉक झाले आहेत. कॉलेजमध्ये थिएटर करत असताना शाहरुखने एवढा अभ्यास कधी केला? असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे.
advertisement
3/7
व्हायरल होणाऱ्या मार्कशीटवर शाहरुख खानचा फोटोदेखील दिसत आहे. 1985-1988 दरम्यानची ही मार्कशीट आहे. या मार्कशीटमध्ये अर्थशास्त्रात किंग खानला 92 मार्क मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तर इंग्लिशमध्ये 51 आणि गणित, फिजिक्समध्ये 78 मार्क्स मिळाले आहेत.
advertisement
4/7
शाळा-महाविद्यालयीन आयुष्यातही शाहरुख खान खूप मेहनती आणि फोकस असल्याचा अंदाज या मार्कशीटवरुन येत आहे. शाहरुखने कधीच अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं नाही. प्रामाणिकपणे त्याने अभ्यास केला. आज कामाकही त्याचे हे गूण पाहायला मिळतात. या सर्व गोष्टींमुळेच आजच्या घडीला तो एक उत्कृष्ट सुपरस्टार आहे.
advertisement
5/7
शाहरुख खानने हंसराज महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. त्यानंतर दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया यूनिव्हर्सिटीमधून त्याने M.A केलं. विशेष म्हणजे त्याने IIT ची एंट्रेंसदेखील क्रॅक केली आहे. पण पुढे थिएटर, मालिका करत असताना अभिनयात रुची निर्माण झाली आणि तो अभिनयाकडे वळला.
advertisement
6/7
शाहरुख खान शेवटचा 2023 मध्ये आलेल्या 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तीन बिग बजेट चित्रपटांत झळकला. त्यानंतर लेक आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या नेटफ्लिक्सवरील वेबसीरिजमध्येही त्याची झलक पाहायला मिळाली.
advertisement
7/7
शाहरुख खान सध्या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'किंग' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सुहाना खान, अभिषेक बच्चन आणि दीपिका पादुकोणदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शाहरुख खानची मार्कशीट व्हायरल, अर्थशास्त्रात 92, गणितात किती? तुम्हीच पाहा PHOTOS