TRENDING:

जेव्हा मराठमोळ्या शाल्मली खोलगडेला करायचं होतं फरहान शेखशी लग्न, आईने विचारलेले 2 प्रश्न, शॉक झालेली गायिका

Last Updated:
गायिका शाल्मली खोलगडेने कोरोना काळात फरहान शेखशी साध्या पद्धतीने लग्न केले. तिच्या आईने तिने विचारलेले ते दोन प्रश्न ऐकून ती शॉक झाली होती.
advertisement
1/7
मराठमोळ्या फरहान शेखशी लग्नाआधी शाल्मली खोलगडेला आईने विचारलेले 2 प्रश्न
मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडेनं तिच्या आवाजानं लाखोंच्या मनावर राज्य केलं.  तिच्या बिनधास्त स्वभावासाठी आणि प्रामाणिक मतांसाठीही ती ओळखली जाते. 'बलम पिचकारी', 'पिया के बाजार में', 'शायराना' सारख्या अनेक गाण्यांमधून शाल्मलीनं तिच्या आवाजाची जादू दाखवून दिली.
advertisement
2/7
शाल्मली तिच्या गाण्यांसाठी कायम प्रसिद्धीझोतात होतीच. कोरोना काळात शाल्मलीनं बॉयफ्रेंड फरहान शेखशी लग्न केलं. तिच्या आयुष्यातील या निर्णयाची खूप चर्चा झाली. शाल्मलीनं एका मुलाखतीत फरहानशी लग्न करण्याचा निर्णय जेव्हा आईला सांगितला तेव्हा आईने तिला फक्त दोन प्रश्न विचारले. ते ऐकून ती अक्षरशः शॉक झाली होती.
advertisement
3/7
शाल्मलीने सांगितलं की, तिने आईला फरहानसोबतच्या नात्याबाबत मनमोकळेपणाने सांगितलं. त्यावर आईने तिला थेट दोन प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता, "तुम्ही दोघे मुलांविषयी बोलले आहात का?" शाल्मली म्हणाली हो आमचं त्यावर बोलणं झालं आहे.
advertisement
4/7
आईने लगेच दुसरा प्रश्न विचारला, "सेक्स कसा आहे?" आईकडून असा थेट प्रश्न ऐकून शाल्मली शॉक झाली. या प्रश्नावर उत्तर देताना शाल्मली म्हणाली की, गुड.  त्यावर तिच्या आईने अगदी सहजपणे, "ओके, ग्रेट" असं म्हटलं.
advertisement
5/7
शाल्मलीचे आई-वडिल अत्यंत पुढारलेल्या विचारांचे आहेत. त्यामुळे फरहान शेखसोबत लग्न करताना शाल्मली कोणतीही अडचण आली नाही.
advertisement
6/7
शाल्मलीच्या आईने विचारलेले हे दोन प्रश्न सहसा कोणतेही पालक आपल्या मुलांना विचारत नाहीत. लग्नासारख्या मोठ्या निर्णयाआधी या दोन गोष्टी स्पष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. शाल्मली म्हणाली, "जर या दोन प्रश्नांची समाधानकारक उत्तरं नसतील, मग त्यामागे कोणतंही कारण असो, तर त्या व्यक्तीबाबत पुन्हा विचार करण्याची गरज आहे."
advertisement
7/7
गायिका शाल्मली खोलगडे हिनं 22 नोव्हेंबर 2021 रोजी फरहान शेखसोबत लग्न केलं. त्यांच्या आंतरधर्मीय लग्नाला दोन्ही कुटुंबाने सपोर्ट केला. फरहान आणि शाल्मली यांनी कोरोना काळात घरच्या घरी अत्यंत साध्या पद्धतीनं लग्न केलं. हिंदू पद्धतीनं लग्न आणि त्यानंतर त्यांनी निकाह देखील केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
जेव्हा मराठमोळ्या शाल्मली खोलगडेला करायचं होतं फरहान शेखशी लग्न, आईने विचारलेले 2 प्रश्न, शॉक झालेली गायिका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल