TRENDING:

Priya Marathe : आधी वडील गेले आता पत्नीही, प्रियाच्या मृत्यूनंतर शंतनुची काय झालीये अवस्था; सुबोध म्हणाला, 'माझ्याशी बोलताना तो...'

Last Updated:
Shantanu Moghe : अभिनेत्री प्रिया मराठेच्या कठीण काळात तिची नवरा शंतनु मोघेनं तिला लाखमोलाची साथ दिली. तिच्या निधनानंतर त्याची काय अवस्था आहे याबद्दल अभिनेता सुबोध भावेनं एका मुलाखतीत सांगितलं.
advertisement
1/9
प्रियाच्या मृत्यूनंतर शंतनुची काय झालीये अवस्था, सुबोध म्हणाला, 'बोलताना तो...'
अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. प्रियाचं कॅन्सरनं निधन झालं. प्रियाच्या निधनाचा सर्वात मोठा धक्का तिचा नवरा अभिनेता शंतनु मोघेला बसला. प्रियाच्या कठीण काळात त्याने तिला खूप साथ दिली. चार वर्षांआधी शंतनुचे वडील अभिनेत श्रीकांत मोघे यांचं निधन झालं. त्यानंतर आता प्रियाची साथ सुटली. 
advertisement
2/9
अभिनेता आणि प्रियाचा चुलत भाऊ सुबोध भावे यानं प्रियाच्या आठवणींना उजाळा दिला. प्रियाच्या निधनानंतर शंतनुबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितलं. 
advertisement
3/9
लोकमत फिल्मीशी बोलताना सुबोध म्हणाला, "इतक्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर त्यातून बाहेर येण्यासाठी काळ आपल्याला शक्ती देते. काळ शक्ती देईल पण ते दोघेच एकमेकांना होते."
advertisement
4/9
"गेल्या 14 वर्षांचा काळ त्यांनी एकत्रित व्यथित केला होता. अनेक उपक्रम त्यांनी केले होते. फिरले होते, घर घेतलं होतं, हॉटेल काढलं होतं, व्यवसाय सुरू केला होता. दोघांचं प्लॅटोनिक असोसिएशन आहे."
advertisement
5/9
सुबोध पुढे म्हणाला, "शंतनु ज्यांना खूप मानायचा ते म्हणजे त्याचे वडील श्रीकांत मोघे, ते अत्यंत जिंदादील एक्टर होते, विलक्षण प्रतिभेचे अभिनेते होते. त्याच्या आयुष्यातून त्यांचंही जाणं झालंय, आता प्रियाचं जाणं झालंय."
advertisement
6/9
"शंतनु अत्यंत सेन्सिबल मुलगा आहे, हुशार आहे. मला खात्री आहे की परमेश्वर त्याला या दु:खातून बाहेर येण्याची ताकद नक्कीच देईल."
advertisement
7/9
सुबोध म्हणाला, "तुटलाय की नाही, मला असं वाटतं की कुठलाच माणूस आतुन सावरायचा प्रयत्न करत असतो. आम्ही हिच प्रार्थना करतो की, त्याने जे सहन केलंय, त्याच्या डोळ्यांनी जी पाहिलंय, त्याने जे भोगलंय, त्याची आपण कल्पना करू शकत नाही. आपण फक्त प्रार्थना करू शकतो की, सगळ्या प्रकारचं बळ त्याला मिळो."
advertisement
8/9
"त्याला मानसिकरित्या ताकदीने यातून बाहेर येऊन काम करण्याची ताकद मिळो. त्याला भरपूर काम मिळो, काम करून रिकाम्या वेळात आठवणी राहणार नाहीत."
advertisement
9/9
"मी त्याला भेटल्यानंतर तो त्यांच्या आयुष्यातील प्रियाच्या चांगल्याच आठवणी मला सांगत होता. आम्ही सगळे त्याच्याबरोबर आहोत आणि आयुष्यभर त्याच्याबरोबर राहू. कारण तो आणि प्रिया आमच्यासाठी वेगळे नाहीत, ते एकच आहेत."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priya Marathe : आधी वडील गेले आता पत्नीही, प्रियाच्या मृत्यूनंतर शंतनुची काय झालीये अवस्था; सुबोध म्हणाला, 'माझ्याशी बोलताना तो...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल