शिवसेना नेत्याच्या घरी लगीनघाई! बिग बॉस गाजवणारी अभिनेत्री होणार सूनबाई
- Published by:Minal Gurav
Last Updated:
शिवसेना नेत्याच्या घरी लगीनघाई आहे. बिग बॉस गाजवणारी अभिनेत्री त्यांची सून होणार आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा संपन्न झालाय.
advertisement
1/9

दिवाळी नुकतीच झाली असून आता लगीन सराईला सुरूवात झाली आहे. अनेक राजकीय नेते मंडळी आमि कलाकारांच्या घरी सनई चौघडे वाजणार आहे. अशातच शिवसेनाच्या नेत्याच्या घरी देखील लगीनघाई सुरू झाली आहे.
advertisement
2/9
बिग बॉस गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री त्यांची सूनबाई होणार आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा संपन्न झाला. साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
3/9
शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांच्या घरी लगीन घाई आहे. त्यांचा मुलगा समाधान सरवणकर याचा साखरपुडा झाला.
advertisement
4/9
समाधान सरवणकर हे प्रभादेवीमधील माजी नगरसेवक आहेत. माजी आमदार सदा सरवणकर हे त्यांचे व़डील आहेत.
advertisement
5/9
सदा सरवणकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष नगरसेवक होते. त्याशिवाय दादर-माहीम विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले.
advertisement
6/9
समाधान सरवणकर यांच्यासोबत अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हीने साखरपुडा केला आहे.
advertisement
7/9
दोघांच्या साखरपुड्याची बातमी समोर येताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
advertisement
8/9
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये दिसली होती. पण हाताच्या दुखापतीमुळे तिला नाईलाजास्तव एक्झिट घ्यावी लागली.
advertisement
9/9
'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत तिनं खलनायिका साकारली होती. जी प्रेक्षकांना आवडली. 'छापा काटा', 'वॉन्टेंड बायको नंबर वन', 'गुलदस्ता', 'दोघांत तिसरा आता सगळं विसरा', 'कलावती' सारख्या प्रसिद्ध सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शिवसेना नेत्याच्या घरी लगीनघाई! बिग बॉस गाजवणारी अभिनेत्री होणार सूनबाई