सासरा सेर, जावई सव्वाशेर! श्वेता बच्चनच्या नवऱ्याने अमिताभच्या शेजारी घेतली आलिशान प्रॉपर्टी, किंमत ऐकून झटका बसेल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Nikhil Nanda Buys Luxury Apartment : अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा यांनी जुहूमध्ये आलिशान अपार्टमेंट खरेदी केले. या घराची किंमत ऐकून झटका बसेल.
advertisement
1/11

अभिनेते अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांची मुंबईत खूप मोठी प्रॉपर्टी आहे. एकट्या जुहूमध्ये त्यांचे तीन मोठे आलिशान बंगले आहेत. त्यांचे तिनही बंगले पाहण्यासाठी लोक लांबून तिथे येत असतात.
advertisement
2/11
अमिताभ बच्चन यांचे जावई देखील त्यांच्याइतकेच श्रीमंत आहेत. पण सासरे अमिताभ जर शेर असतील तर त्यांचा जावई सव्वाशेर आहे. अमिताभ यांच्या जावयानं त्यांच्याच शेजारी आलिशान घर खरेदी केलं आहे.
advertisement
3/11
अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा हे अनेकदा प्रसिद्धीपासून दूर राहतात.पण अनेकदा ते कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.
advertisement
4/11
त्यांनी नुकतंच मुंबईतील पॉश जुहू परिसरात कोट्यवधी रुपयांचे एक नवीन आलिशान घर खरेदी केले आहे. याच भागात बच्चन कुटुंबाचे प्रसिद्ध बंगले, प्रतीक्षा आणि जलसा आहेत.
advertisement
5/11
रिअल इस्टेट रिसर्च आणि डेटा अॅनालिटिक्स फर्म लायसेस फोरास यांनी मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, मालमत्ता करार 16 ऑक्टोबर 2025 रोजी नोंदणीकृत झाला होता.
advertisement
6/11
ही खरेदी निखिलची बहीण निताशा नंदा यांच्यामार्फत करण्यात आली होती. ज्यांनी त्यांच्या पॉवर ऑफ अॅटर्नीवर सही केली होती. अपार्टमेंटची किंमत 28 कोटी रुपये आहे.
advertisement
7/11
निखिल हे एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते सध्या दिल्लीत राहतात.
advertisement
8/11
बच्चन-नंदा कुटुंबासोबतही ते मुंबईत एकत्र वेळ घालवतात. अगस्त्य नंदा आणि नव्या नवेली नंदा यांच्यासाठी त्यांनी हे घर घेतल्याचं बोललं जात आहे.
advertisement
9/11
हे अपार्टमेंट 3,139 स्क्वेअर फूटवर पसरलेलं आहे. ज्यामध्ये 144 स्क्वेअर फूट टेरेस आहे. त्याचा एकूण आकार अंदाजे 3,550 स्क्वेअर फूट आहे. अपार्टमेंटसह तीन कार पार्किंग जागा देखील मिळाल्या आहेत.
advertisement
10/11
निखिल नंदा यांनी 1997मध्ये श्वेता बच्चनशी लग्न केलं. या लग्नामुळे बॉलीवूडमधील बच्चन आणि कपूर ही दोन सर्वात प्रतिष्ठित कुटुंबं एकत्र आली. त्यांचे लग्न त्या काळातील सर्वात चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक होतं.
advertisement
11/11
निखिल हा रितू नंदा आणि राजन नंदा यांचा मुलगा आहे. तसंच दिग्गज अभिनेता राज कपूर यांचा नातू आहे. निखिल आणि श्वेता यांना नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा ही दोन मुलं आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सासरा सेर, जावई सव्वाशेर! श्वेता बच्चनच्या नवऱ्याने अमिताभच्या शेजारी घेतली आलिशान प्रॉपर्टी, किंमत ऐकून झटका बसेल