Naga-Sobhita Love Story: लंच डेट, सीक्रेट ट्रिप्स, अशी सुरु झाली नागा-शोभिताची Love Story!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Naga-Sobhita Love Story: अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला हे कपल सतत चर्चेत असतं. समांथाची घटस्फोट घेतल्यानंतर नागाने शोभिताशी लग्नगाठ बांधली. मात्र फार कमी लोकांना माहितीय की नागा-शोभिताची लव्हस्टोरी कशी सुरु झाली?
advertisement
1/7

लोकप्रिय अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांनी डिसेंबर 2025 मध्ये हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पारंपरिक विधींनुसार सात फेरे घेतले आणि ते विवाहबंधनात अडकले. या विवाह सोहळ्यासाठी केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नाच्या आधी हे दोघे एकमेकांना तीन वर्षे डेट करत होते. पण फार कमी लोकांना त्यांची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली माहित आहे. याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
2021 मध्ये सामंथा रुथ प्रभुपासून नागा चैतन्यचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर काही महिन्यांतच शोभितासोबत त्याचे नाव जोडले जाऊ लागले. 2022 मध्ये अफवा उडाली की शोभिता नागा चैतन्यच्या हैदराबादमधील नव्या घरात दिसली होती. दोघांनाही एकत्र पाहिल्याने त्यांच्या नात्याबाबत चर्चांना उधाण आले.
advertisement
3/7
2023 मध्ये मिशेलिन स्टार शेफ सुरेंद्र मोहनने लंडनमधील आपल्या रेस्टॉरंटमधून नागा चैतन्यसोबतचा फोटो शेअर केला होता. त्याच फोटोमध्ये मागे शोभिता दिसत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला. यानंतर हे दोघं खरोखरच रिलेशनशिपमध्ये असल्याचं समजलं.
advertisement
4/7
2024 च्या सुरुवातीला एप्रिल महिन्यात दोघांनी वेगवेगळ्या पोस्ट्सद्वारे जंगल सफारीचे फोटो शेअर केले. ठिकाण तेच असल्याने पुन्हा एकदा त्यांचं एकत्र असणं चर्चेत आलं. मे महिन्यात हे दोघं युरोप ट्रीपसाठी गेले होते.
advertisement
5/7
9 ऑगस्ट रोजी चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी अधिकृत घोषणा केली की नागा आणि शोभिताची साखरपुडा झाला आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यात त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सना सुरुवात झाली. यात 'राता स्थापना', 'मंगल स्नानम', आणि 'पेली कुथुरु' यांसारख्या पारंपरिक तेलुगू विधी पार पडल्या.
advertisement
6/7
4 डिसेंबर 2024 रोजी सकाळी त्यांच्या विवाह सोहळ्याला सुरुवात झाली. सुमारे 8 तास विविध पारंपरिक विधींमध्ये दोघांनी एकमेकांशी विवाह केला. या खास प्रसंगी चिरंजीवी, अल्लू अर्जुन, रामचरण यांसारख्या तेलुगू सिनेसृष्टीतील दिग्गज उपस्थित होते.
advertisement
7/7
नागा आणि शोभिता यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पण त्यांचू लव्ह स्टोरी त्यांनी प्रायव्हेट ठेवली होती त्यामुळे अनेकांना त्यांच्याविषयी कळालं नाही. जेव्हा दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा अनेकांना धक्का बसला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Naga-Sobhita Love Story: लंच डेट, सीक्रेट ट्रिप्स, अशी सुरु झाली नागा-शोभिताची Love Story!