लपवूनी लपलेच नाही...! पूजा बिरारीचा फॅमिली फोटो, सोहम बांदेकरला रहावलं नाही; केली अशी कमेन्ट, वेधलं सगळ्यांचं लक्ष
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Soham Bandekar - Pooja Birari : अभिनेता सोहम आदेश बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचा ऑनलाइन रोमान्स नेटकऱ्यांनी चांगलाच हेरलाय. पूजाच्या फोटोवर सोहमने केलेली कमेंट चर्चेत आली आहे.
advertisement
1/9

अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी हे रिलेशनमध्ये असून लवकरच दोघे लग्न करणार आहेत.
advertisement
2/9
दोघांच्या रिलेशनबाबत त्यांनी अद्याप अधिकृतपणे सांगितलेलं नाही पण त्यांच्या अनेक कृतींमधून ते दिसून आलं आहे.
advertisement
3/9
दरम्यान दिवाळीच्या दिवसांत त्यांचं प्रेम कितीही लपवलं तरी लपू शकलेलं नाही. चाहत्यांनी गुपचूप सुरू असलेलं प्रेम पकडलंय.
advertisement
4/9
अभिनेत्री पूजा बिरारी हिनं लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं तिचा फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोवर नेहमीप्रमाणे तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं.
advertisement
5/9
फोटोला हजरो लाइक्स आणि कमेंट्स होत्या. पण त्यातील एका कमेंटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. ही कमेंट होती सोहम बांदेकरची.
advertisement
6/9
दिवाळीच्या शुभेच्छा म्हणत पूजाने तिच्या आई-बाबांबरोबरचे फोटो शेअर केलेत. पूजा तिच्या आई-बाबांबरोबर प्रचंड खुश दिसतेय. होणारी बायको आणि होणारे सासू सासरे यांना पाहून सोहमला काही रहावलं नाही.
advertisement
7/9
पूजाच्या फोटोवर त्याने हॉर्ट इमोजी पोस्ट केलेत. सोहमच्या या कमेंटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. सोहमच्या कमेंटवर पूजाने देखील रिप्लाय करत हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.
advertisement
8/9
दोघांचा हा ऑनलाइन रोमान्स नेटकऱ्यांनी मात्र चांगलाच हेरला. पूजाच्या फोटोवरची सोहम बांदेकरनं केलेली कमेंट सध्या चर्चेत आली आहे.
advertisement
9/9
दोघे कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लपवूनी लपलेच नाही...! पूजा बिरारीचा फॅमिली फोटो, सोहम बांदेकरला रहावलं नाही; केली अशी कमेन्ट, वेधलं सगळ्यांचं लक्ष