कन्फर्म! सोनम कपूरकडे दुसऱ्यांदा Good News! फॅशनेबल कपड्यात दाखवला बेबी बंप, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sonam Kapoor Second Pregnancy : अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर सोनमनं त्या चर्चांवर शिक्का मोर्तब केला आहे. सोनमनं तिची दुसरी प्रेग्नंच कन्फर्म केली आहे.
advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा त्याचप्रमाणे अभिनेत्री परिणीता चोप्रा यांना नुकतंच कन्यारत्न प्राप्त झालं. अशातच बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबातून आणखी एक गुड न्यूज समोर येत आहे.
advertisement
2/7
अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चांवर अखेर शिक्का मोर्तब झाला आहे. सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. सोनमनं तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
advertisement
3/7
बॉलिवूड अभिनेत्री आणि स्टाईल आयकॉन सोनम कपूरने तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसची बातमी कन्फर्म केली. तिने इंस्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केलेत. थोडे हटके आणि स्टायलिश अंदाजात ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसतेय. मदर असं शब्द लिहित सोनमने तिचे फोटो शेअर केलेत.
advertisement
4/7
दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा करत सोनमने खास हॉट-पिंक नॅचरल लोकरीचा ड्रेस वेअर केला आहे. सोनमने तिचा बेबी बंपसह फोटो शेअर करताच तिचा पती आनंद आहुजानं Double Trouble म्हणत कमेंट केली आहे. त्याच्या कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
5/7
सोनम आणि आनंद अहुजा यांना 2022 साली पहिला मुलगा झाला. तेव्हा सोनम 37 वर्षांची होती. वायु असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. वायु नुकताच तीन वर्षांचा झाला आहे. त्यानंतर सोनम आता दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. वयाच्या चाळीशीत सोनमनं दुसऱ्यांदा आई होणार आहे.
advertisement
6/7
सोनमने बॉलिवूडमध्ये पदार्पण संजय लीला भन्साळी यांच्या सावरिया सिनेमातून डेब्यू केला होता. त्यानंतर राझणा, नीरजा, प्रेम रतन धन पायो सारख्या सिनेमात तिने काम केलं.
advertisement
7/7
सोनम शेवटची 2023 मधील क्राइम-थ्रिलर असलेल्या Blind सिनेमात दिसली होती. हा सिनेमा 2011 मधील कोरियन सिनेमाचा रिमेक होता. दरम्यान सोनम कपूर अभिनयात कमबॅक करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. चाहत्यांनी तिच्या कमबॅकबद्दल उत्सुकता देखील दाखवली होती. मात्र अशातच आता तिने दुसऱ्या प्रेग्नंसीची बातमी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कन्फर्म! सोनम कपूरकडे दुसऱ्यांदा Good News! फॅशनेबल कपड्यात दाखवला बेबी बंप, PHOTO