64 वर्षांचा सुपरस्टार, 22 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन्स, मग आली माफी मागायची वेळ, पण का?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सिनेमा म्हटलं की त्यात रोमँटीक सीन्स, इंटिमेट सीन्स आले. अनेकदा आपल्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठ्या कलाकाराबरोबर असे सीन्स करावे लागतात. 20 वर्षांआधी आलेल्या एका सिनेमात एका 64 वर्षांच्या अभिनेत्याने 22 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीबरोबर इंटिमेट सीन्स दिले होते. त्यांनी सीन तर पूर्ण केला मात्र त्यानंतर अभिनेत्याने अभिनेत्रीची हात जोडून माफी मागितली. अभिनेत्यावर का आली अशी वेळ?
advertisement
1/7

सुपरस्टार मोहनलालचा 'थनमथरा' हा सिनेमा रिलीज होऊन 20 वर्ष झाली आहेत. मल्याळी प्रेक्षकांसाठी हा अत्यंत जवळचा सिनेमा आहे. या सिनेमात मीरा वासुदेवन यांनी मोहनलाल यांच्यासोबत प्रमुख भुमिका साकारली होती. या सिनेमातील एक सीन आजही चर्चेत असते.
advertisement
2/7
अभिनेत्री मीरा यांनी काही दिवसांआधी एका मुलाखतीत बोलताना त्या सीनवर भाष्य केलं होतं. मोहनलाल यांनी 'थनमथरा' मध्ये रमेशन नायरची भूमिका केली होती. चित्रपटात रमेशनच्या अल्झायमर आणि त्याच्या परिणामांचा शोध घेण्यात आला आहे.
advertisement
3/7
'थनमथरा' मध्ये अनेक इमोशनल सीन्स आहेत. एका सीनमध्ये हिरो हिरोईनबरोबर इंटिमेट होत असल्याचा सीन दाखवण्यात आला आहे. पण तेवढ्यात त्याला भिंतीवर पाल दिसते आणि तो अस्वस्थ होतो. तो तसाच उठतो आणि निघून जातो.
advertisement
4/7
या सीनमध्ये हिरोवर त्या आजारचा परिणाम होऊ लागला आहे असं दाखवण्यात आलं होतं. पण हा संपूर्ण सीन थिएटरमध्ये दाखवण्यात आला नाही. न्यूडिटीमुळे सेन्सॉरने या सीन्सना कात्री लावली.
advertisement
5/7
मीरा वासुदेवन यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, "मोहनलाल सरांसाठी तो सीन खूप कठीण होता कारण त्यांना त्या सीनसाठी पूर्णपणे नग्न राहावे लागले. ते त्यांच्यासाठी अधिक आव्हानात्मक होते."
advertisement
6/7
मोहनलाल यांनी अभिनेत्रीला शूटिंगच्या आधी कम्फर्टेबल केलं होतं. अभिनेत्री म्हणाली, "शूट करण्यापूर्वी ते आला आणि माझी माफी मागितली. ते म्हणाले, मला याबद्दल खूप वाईट वाटतंय. जर मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे लाजवत असेल तर कृपया मला माफ करा."
advertisement
7/7
या सीनवेळी अभिनेते मोहनलाल यांनी कॅमेरा फिरेपर्यंत पेटीकोट घातला होता. हा सीन एका खोलीत कमी माणसांमध्ये शूट करण्यात आला होता. अभिनेत्री म्हणाली, "आम्ही सर्वांनी या सीनवर शुद्ध मनाने आणि प्रामाणिकपणे काम केले." 'थनमथरा'ला सर्वोत्कृष्ट मल्याळम सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मोहनलाल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
64 वर्षांचा सुपरस्टार, 22 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन्स, मग आली माफी मागायची वेळ, पण का?