TRENDING:

Sunita Ahuja on Govinda Affair : मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाचं अफेअर? सुनिता पहिल्यांदा अन् स्पष्टच बोलली, म्हणाली, 'ठोस पुरावे...'

Last Updated:
Sunita Ahuja on Govinda Affair : अभिनेता गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चा मागील काही महिन्यात रंगल्या होत्या. त्या चर्चांवर अखेर त्याची पत्नी सुनिता अहुजा हिनं मौन सोडलं आहे.
advertisement
1/9
मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाचं अफेअर? सुनिता स्पष्टच बोलली; म्हणाली,ठोस पुरावे...
अभिनेता गोविंदा आणि सुनिता यांच्या नात्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. दोघांचा डिवोर्स होणार असल्याचं बोललं जात होतं. पण गणेश चतुर्थीला दोघे एकत्र आले आणि पुन्हा या चर्चा खोट्या ठरल्या.
advertisement
2/9
मात्र आता पुन्हा एकदा दोघांचं नात चर्चेत आलं आहे. सुनिता पहिल्यांदाच गोविंदाच्या एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअरबद्दल खुलेपणाने बोलली आहे.
advertisement
3/9
सुनिताने शेअर केलेल्या तिच्या व्लॉगमध्ये तिला संभावना सेठनं गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांबद्दल विचारलं. सुनिता म्हणाली, "मी देखील ही गोष्ट ऐकली आहे. मी देखील क्लिअरली बोलले आहे की, ज्या दिवशी मला कळेल की चीची मला धोका देत आहे. त्यादिवशी मी स्वत: मीडियाच्या समोर उभी राहून हे सांगेन की हा मला धोका देत आहे. "
advertisement
4/9
"प्रोब्लेम असा आहे की, त्याच्या कुटुंबातील लोक मला आणि गोविंदाला एकत्र पाहू शकत नाहीत. त्यांना असं वाटतं की यांची फॅमिली इतकी खुश कशी आहे, त्यांचे स्वत:चे बायका पोरं मेली आहेत."
advertisement
5/9
"गोविंदा चांगल्या लोकांसोबत उठ बैस करत नाही. मी नेहमी म्हणते की, घाणेरड्या लोकांसोबत राहिलात की तुम्ही घाणेरडेच होता. आज मला आणि माझ्या मुलांना फ्रेंड सर्कल नाहीये. माझी मुलचं माझे मित्र आहेत."
advertisement
6/9
संभावनाने सुनिला विचारलं की तुला डाऊट आहे का? या सगळ्यावर पुढे काय ठरवलंय?सुनिता म्हणाली, "चीची 15 वर्षांपासून माझ्या घराच्या समोर राहतोय. तो घरी येऊन जाऊन असतो. पण जोपर्यंत मला ठोस पुरावा मिळत नाही, मी स्वत: मीडियासमोर जाऊन ही गोष्ट बोलेन."
advertisement
7/9
"एक स्त्री म्हणून ही चुकीची गोष्ट आहे. चांगल्या स्त्रीला जो दु:ख देईल त्याला कधीच सुख मिळणार नाही. तो स्वत: बैचेन राहील. मी माझं संपूर्ण आयुष्य गोविंदाला दिलं आहे. माझं बालपण ते आज मी 55 वर्षांची झालीये, मी आजवर गोविंदावर प्रेम करतेय. "
advertisement
8/9
तुमच्या मनात काही आहे असं संभावनाने विचारलं. सुनिता म्हणाली, "जे आहे ते मी तिला ( देवीला ) सांगितलं आहे. असं काही असेल तर ती ( देवी ) त्रिशूलने बघून घेईल. मी फक्त ऐकतेय. पण माझ्याकडे माझी मुलं आहेत."
advertisement
9/9
"मी मीडियालाही सांगितलं आहे. मी जर पकडलं तर खतम, जय माता दी. सनी देओल म्हणतो ना ढाई किलो का हात हैं, माझा तर पाच किलोचा आहे. धबाधब मी देईल कारण यात मातारानीची पावर येईल. मी मागेपुढे बघणार नाही."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sunita Ahuja on Govinda Affair : मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाचं अफेअर? सुनिता पहिल्यांदा अन् स्पष्टच बोलली, म्हणाली, 'ठोस पुरावे...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल