Govinda-Sunita : 'मी जर त्याला पकडलं तर खतम', गोविंदाने असं केलंय काय, ज्याचा बदला घेण्यासाठी सुनिता आधीच तयार
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sunita - Govinda : अभिनेता गोविंदा आणि सुनिताच्या डिवोर्सच्या चर्चा मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. दरम्यान सुनिताने पुन्हा एकदा दोघांच्या नात्यावर खळबळजनक भाष्य केलं आहे.
advertisement
1/9

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता यांचं नातं गेली अनेक महिने चर्चेत आहे. सुनीताने डिवोर्स देखील फाइल केल्याचं बोललं गेलं होतं. पण गणपतीत या सगळ्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.
advertisement
2/9
दरम्यान सुनिताने तिच्या युट्यूब चॅनेलवर एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात 'मी जर पकडलं तर खतम...' असं म्हणत तिने गोविंदाला थेट इशारा दिला आहे.
advertisement
3/9
गोविंदाने असं काय केलंय ज्याचा बदला घेण्यासाठी सुनिता आधीपासूनच रेडी आहे. सुनिता गोविंदाच्या अफेअरवर पहिल्यांदा भाष्य केलं आहे.
advertisement
4/9
सुनिता म्हणाली, "जे लोक माझ्या डोळ्यात पाणी आणतील त्या लोकांना माता राणी तिच्या शस्त्रांनी मला त्यांचा एक एक करून मृत्यू बघायचा आहे. मी सगळ्यांसाठी इतकं काही करते पण माझ्याच डोळ्यात अश्रू का येतात."
advertisement
5/9
"मी कधीच कोणासमोर झुकत नाही. माणसाने माणसासमोर रडू नये त्यांच्यासमोर ( देवासमोर ) रडावं. मी मरून जाईन पण माणसांसमोर रडणार नाही. मी यांच्या ( देवासमोर ) रडते, डोकं टेकवते. जिद्द करते की माझी इच्छा पूर्ण कर."
advertisement
6/9
सुनीता संभावना सेठ हिने सुनीताला गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांबद्दल विचारलं. त्यावर सुनीता म्हणाली, "मी देखील ही गोष्ट ऐकली आहे. मी देखील क्लिअरली बोलले आहे की, ज्या दिवशी मला कळेल की चीची मला धोका देत आहे. त्यादिवशी मी स्वत: मीडियाच्या समोर उभी राहून हे सांगेन की हा मला धोका देत आहे. "
advertisement
7/9
जोवर मला ठोस पुरावा सापडत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही, असं सुनीताने सांगितलं. सुनीता म्हणाली, "मी मीडियालाही सांगितलं आहे. मी जर पकडलं तर खतम, जय माता दी."
advertisement
8/9
"सनी देओल म्हणतो ना ढाई किलो का हात हैं, माझा तर पाच किलोचा आहे. धबाधब मी देईल कारण यात मातारानीची पावर येईल. मी मागेपुढे बघणार नाही."
advertisement
9/9
सुनिता पुढे असंही म्हणाली की, "एक स्त्री म्हणून ही चुकीची गोष्ट आहे. चांगल्या स्त्रीला जो दु:ख देईल त्याला कधीच सुख मिळणार नाही. तो स्वत: बैचेन राहील. मी माझं संपूर्ण आयुष्य गोविंदाला दिलं आहे. माझं बालपण ते आज मी 55 वर्षांची झालीये, मी आजवर गोविंदावर प्रेम करतेय. "
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Govinda-Sunita : 'मी जर त्याला पकडलं तर खतम', गोविंदाने असं केलंय काय, ज्याचा बदला घेण्यासाठी सुनिता आधीच तयार