TRENDING:

'प्रियाने करिश्माचा संसार उद्ध्वस्त केला', संजय कपूरच्या बहिणीचा शॉकिंग खुलासा

Last Updated:
Mandira Kapur on Karisma-Sunjay Divorce : करिश्मा कपूरचा एक्स नवरा उद्योगपती संजय कपूरचं काही दिवसांआधी निधन झालं. त्यानंतर त्याची तिसरी पत्नी प्रिया सचदेववर अनेक आरोप करण्यात आले. संजयच्या संपत्तीचा वाद चर्चेत आहे. अशातच संजयच्या बहिणीने करिश्माची बाजू घेत तिचा संसार मोडण्यात प्रिया सचदेवला कारणीभूत ठरवलं आहे.
advertisement
1/9
'प्रियाने करिश्माचा संसार उद्ध्वस्त केला', संजय कपूरच्या बहिणीचा शॉकिंग खुलासा
करिश्मा कपूरचा एक्स नवरा संजय कपूरचं 12 जून 2025 रोजी विंडसरमधील Guards Polo Club येथे पोलो सामन्यादरम्यान निधन झालं.  संजय कपूरच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीचा वाद चव्हाट्यावर आला आहे.
advertisement
2/9
संजय कपूर यांच्या बहिणीने त्याची तिसरी बायको प्रिया सचदेववर गंभीर आरोप केले आहेत.  मंदिरा कपूर स्मिथने करिश्मा आणि संजयच्या डिवोर्ससाठी प्रिया सचदेवला कारणीभूत ठरवलं आहे.
advertisement
3/9
पत्रकार विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत संजय कपूरची बहीण मंदिरा म्हणाली, "मला संजय आणि प्रियाच्या वाढत्या जवळीकतेची कल्पना होती. ते फ्लाइटमध्ये भेटले आणि त्यानंतर सगलं काही बदललं. लोलो (करिश्मा) आणि माझा भाऊ त्या वेळी खूप आनंदी होते. कियानचा नुकताच जन्म झाला होता. संजय आपल्या मुलांबरोबर खूप खुश होता.
advertisement
4/9
ती पुढे म्हणाली, "एका दुसऱ्या महिलेनं नुकतीच आई झालेल्या स्त्रीची काळजी न घेणं हे चुकीचं आहे. आनंदी कुटुंबात येऊन ते उद्ध्वस्त करणे योग्य नाही. जेव्हा दोन लहान मुलं असतात तेव्हा लग्न तोडणं अन्यायकारक असतं आणि लोलो हे डिझर्व करत नव्हती."
advertisement
5/9
मंदिरानं असंही सांगितलं की संजय आणि प्रियाच्या लग्नाला त्यांच्या वडिलांचा विरोध होता. ती म्हणाली, "बाबांनी सांगितलं होतं की संजयनं प्रियाशी लग्न करू नये. त्यांना तिचा चेहराही पाहायचा नव्हता."
advertisement
6/9
"कुटुंबातील कोणाचाही त्यांच्या नात्याला सपोर्ट नव्हता. मी फक्त भावावरच्या प्रेमापोटी त्याच्याशी संपर्क ठेवला होता. लोलोकडे मुलं, घर, प्रेम सगळं होतं. त्यांनी ते लग्न टिकवायला हवं होतं", असंही मंदिराने सांगितलं
advertisement
7/9
मंदिरा पुढे म्हणाली, "2017मध्ये संजय आणि प्रियाचं लग्न झालं. मी आणि माझी बहीण, आम्ही कोणीत त्यांच्या लग्नाला गेलो नव्हतो. लग्न करू नकोस आणि मुले होऊ देऊ नकोस, असं आमच्या बाबांनी त्याला स्पष्ट सांगितलं होतं."
advertisement
8/9
करिश्माच्या कठीण काळात मंदिरा तिच्यासोबत नव्हती याचं देखील तिने दु:ख व्यक्त केलं. मंदिरा म्हणाली, "त्या वेळी आमचं बोलणं बंद झालं होतं. ती माझ्यावर रागावली होती आणि मला तिला दोष नाही देता येणार. मला खूप वाईट वाटतं कारण ती माझी सर्वात चांगली मैत्रीण होती. मला तिच्यासाठी उभं राहायला हवं होतं."
advertisement
9/9
संजय कपूरने 2017 मध्ये मॉडेल-उद्योजिका प्रिया सचदेव कपूरशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आहे. तर करिश्मा कपूरसोबतच्या (2003-2016) लग्नातून त्यांना समायरा आणि कियान कपूर ही दोन मुले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'प्रियाने करिश्माचा संसार उद्ध्वस्त केला', संजय कपूरच्या बहिणीचा शॉकिंग खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल