Superhit Breakup Song: 7.12 मिनिटांचं गाणं, ब्रेकअप झालेल्या प्रत्येक आशिकचं फेव्हरेट! माधुरीच्या डुप्लिकेटने हिट केलं साँग, तुम्ही ऐकलं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Superhit Breakup Song: ९० च्या दशकातील एव्हरग्रीन गाण्यांचा विषय निघाला की, डोळ्यासमोर सर्वात आधी उभा राहतो तो ७ मिनिटे १२ सेकंदाचा 'तो' इमोशनल ट्रॅक!
advertisement
1/7

मुंबई: ९० च्या दशकातील एव्हरग्रीन गाण्यांचा विषय निघाला की, डोळ्यासमोर सर्वात आधी उभा राहतो तो ७ मिनिटे १२ सेकंदाचा 'तो' इमोशनल ट्रॅक! ब्रेकअप आणि विरहाचे दुःख शब्दांत मांडणारे हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे.
advertisement
2/7
हे गाणं म्हणजे आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या 'राजा हिंदुस्तानी' (१९९६) या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'परदेसी परदेसी जाना नहीं'. हे गाणे सुपरहिट तर होतेच, पण त्यामागे एक खूपच रंजक आणि धक्कादायक किस्सा दडलेला आहे.
advertisement
3/7
'राजा हिंदुस्तानी' हा १९९६ चा सुपरहिट चित्रपट ठरला, पण त्यातील 'परदेसी परदेसी' गाण्याला जी तुफान लोकप्रियता मिळाली, ती अन्य कोणत्याही गाण्याला मिळाली नाही. हे गाणे तयार होण्यामागे संगीतकार नदीम-श्रवण यांनी घेतलेली रिस्क कारणीभूत ठरली. कुमार सानू यांनी 'इंडियन आयडल १४' च्या सेटवर या गाण्याशी संबंधित एक मोठा खुलासा केला होता.
advertisement
4/7
कुमार सानू यांनी सांगितले की, हे गाणे रेकॉर्ड झाल्यानंतर प्रोड्यूसरना 'परदेसी परदेसी' ही ओळ अजिबात आवडली नव्हती! त्यांनी ती ओळ बदलण्याची मागणी केली. तेव्हा संगीतकार नदीम यांनी प्रोड्यूसरला थेट चॅलेंज स्वीकारले.
advertisement
5/7
नदीम म्हणाले, "एक काम करूया, ही ओळ तशीच राहू दे. जर गाणे चालले नाही, तर त्याला लागलेला संपूर्ण खर्च मी स्वतः देईन. पण जर गाणे ब्लॉकबस्टर ठरले, तर तुम्ही मला दुप्पट पैसे द्याल!" नदीम-श्रवण यांचा आत्मविश्वास जबरदस्त होता आणि त्यांची अट प्रोड्यूसरने स्वीकारली.
advertisement
6/7
या गाण्याची अजून एक खास गोष्ट म्हणजे अभिनेत्री प्रतिभा सिन्हा! ९० च्या दशकात तिला माधुरी दीक्षितची डुप्लिकेट म्हटले जायचे. प्रतिभा सिन्हाच्या साधेपणाने आणि निरागस हावभावांनी या गाण्याला अशी काही जादू दिली की, ती चित्रपटाची मुख्य अभिनेत्री करिश्मा कपूरवरही भारी पडली.
advertisement
7/7
हे गाणे दोन व्हर्जनमध्ये रिलीज झाले होते. एक उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सपना अवस्थी यांनी गायलेले ढाब्यावरचे गाणे, तर दुसरे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेले विरहाचे 'सॅड व्हर्जन'. ६ कोटी बजेटच्या 'राजा हिंदुस्तानी'ने ७६ कोटींचा व्यवसाय केला होता, यात या गाण्याचा मोठा वाटा होता!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Superhit Breakup Song: 7.12 मिनिटांचं गाणं, ब्रेकअप झालेल्या प्रत्येक आशिकचं फेव्हरेट! माधुरीच्या डुप्लिकेटने हिट केलं साँग, तुम्ही ऐकलं?