Tejashri - Bhushan Pradhan : तेजश्री आणि भूषण यांच्यात खास रिलेशन! काय आहे दोघांचं नातं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Tejashri Pradhan - Bhushan Pradhan :अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता भूषण प्रधान दोघेही प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांपैकी एक आहेत. दोघांमध्ये एक खास नातं आहे असं अनेकांना वाटतं.
advertisement
1/9

सध्याची मराठी टेलिव्हिजनची टॉपची अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेजश्री गेली 17 वर्ष मालिका विश्वात काम करतेय. तेजश्रीच्या आतापर्यंतच्या सक्सेसमध्ये तिच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे.
advertisement
2/9
तेजश्रीनं अनेकदा तिच्या आई-वडिलांबद्दल भरभरून बोलली आहे. काही वर्षांआधीच तेजश्रीच्या आईचं निधन झालं. आई आणि वडिलांव्यतिरिक्त तेजश्रीनं कधीच तिच्या इतर फॅमिलीविषयी भाष्य केलेलं नाही.
advertisement
3/9
असं असलं तर अनेकांना असं वाटत आलं आहे प्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान हा तेजश्री प्रधानचा भाऊ आहे. खरंच असं आहे का?
advertisement
4/9
अभिनेता भूषण प्रधान हा मराठी सिनेसृष्टीतला हँडसम हंक अभिनेता आहे. त्याने काही मालिकांमधून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती.
advertisement
5/9
भूषण आणि तेजश्री यांचं आडनाव प्रधान आहे. दोघेही अभिनय क्षेत्रात काम करतात. दोघे एकमेकांचे भाऊ बहिण आहेत असं अनेकांना वाटतं. भूषण प्रधानने एका मुलाखतीत त्याच्याबरोबर तेजश्री प्रधानवरुन घडलेला एक अनुभव शेअर केला होता.
advertisement
6/9
भूषणने सांगितलं, "मी एकदा चुकून सिग्नल तोडला होता. माझ्याआधी एक तेजश्रीनं देखील सिग्लन तोडला होता. पोलिसांनी मला पकडलं. त्यांनी माझा आयडी घेतला. त्यावर नाव होतं भूषण प्रधान. त्यांनी मला विचारलं, तेजश्री प्रधान तुमची बहिण आहे का? तिनेपण सिग्नल तोडला. तुम्ही दोघेही भाऊ-बहिण तसेच आहात.'
advertisement
7/9
"त्यानंतर मी त्यांना सांगितलं की आम्ही भाऊ-बहिण अजिबात नाही. मग मी तेजश्रीला फोन केला आणि तिला विचारलं तू सिग्नल तोडला होता का? मला सुद्धा त्याच पोलिसांनी पडकलं ज्यांनी तुला पकडलं."
advertisement
8/9
या प्रसंगावरुन समजलंच असेल की तेजश्री प्रधान आणि भूषण प्रधान हे एकमेकांचे भाऊ बहिण नाही तर खूप चांगले मित्र आणि सहकलाकार आहेत.
advertisement
9/9
भूषण प्रधानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, तो 'टाइमपास', 'घरत गणपती', 'कॉफी आणि बरंच काही', 'आम्ही दोघी', 'जुनं फर्निचर' सारख्या सिनेमात दिसला आहे. 'पिंजरा' ही त्याची मालिका देखील खूप लोकप्रिय झाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tejashri - Bhushan Pradhan : तेजश्री आणि भूषण यांच्यात खास रिलेशन! काय आहे दोघांचं नातं?