शालिनी नाही आता तायडी म्हणा..! माधवी निमकरचं नव्या मालिकेत जोरदार कमबॅक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री माधवी निमकर पुन्हा एकदा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण आता ती शालिनी नाही तर तायडी म्हणून.
advertisement
1/7

स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनी या पात्राची सर्वाधिक चर्चा झाली. सुप्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकरने ही व्यक्तिरेखा अक्षरश: जिवंत केली. माधवीनं टेलिव्हिजनची टॉपची खलनायिका होण्याचा मान मिळवला.
advertisement
2/7
मात्र आता शालिनी आता शालिनी राहिली नाही तर तायडीच्या रुपात ती प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहच्या तुझ्या सोबतीने या नव्या मालिकेतून माधवी पुन्हा एकदा खलनायिका साकारणार आहे.
advertisement
3/7
तायडी या भूमिकेविषयी सांगताना माधवी म्हणाली, "पुन्हा एकदा खलनायिका साकारणार आहे. प्रचंड उत्सुकता आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं संपल्यानंतर खलनायिका साकारण्यासाठी विचारणा होत होती."
advertisement
4/7
"मला काहीतरी नवं आणि आव्हानात्मक करायचं होतं. याच कारणास्तव सहा महिन्यांचा ब्रेक घेतला. या सहा महिन्यात कुटुंबाला वेळ दिला. तुझ्या सोबतीने मालिकेतल्या तायडी या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा त्या भूमिकेचं वेगळेपण मला भावलं. आधीच्या पात्रापेक्षाही आणखी छान पद्धतीने व्यक्तिरेखा कशी रंगवता येईल याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे."
advertisement
5/7
भूमिकेविषयी सांगताना माधवी म्हणाली, "तायडी इतरांना गिल्ट देऊन त्यांच्याकडून काम करुन घेण्यात तरबेज आहे. तिचा नशिबावर अजिबात विश्वास नाही. तिच्या मते आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवायची असते."
advertisement
6/7
"नशिबावर सोडायची नसते. प्रचंड फिटनेस फ्रिक असलेल्या तायडीला खाण्यात पदार्थाच्या जागी कॅलरीज दिसतात. खऱ्या आयुष्यातही मी फिटनेसला खूप महत्त्व देते. त्यामुळे तायडी आणि माझ्या खऱ्या आयुष्यातलं फिटनेस प्रेम छान जमून आलं आहे."
advertisement
7/7
शालिनीप्रमाणेच माधवी निमकरच्या तायडी या पात्राला देखील प्रेक्षकांचं तितकंच प्रेम मिळेल अशी अपेक्षा आहे. माधवी आता नव्या मालिकेत काय कमाल करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शालिनी नाही आता तायडी म्हणा..! माधवी निमकरचं नव्या मालिकेत जोरदार कमबॅक