IPL Auction 2026 : धोनीने वैतागून सोडून दिला, कोलकाताने अचानक एन्ट्री मारून 18 कोटींना विकत घेतला 'वाईडचा किंग'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IPL Auction 2026 Matheesha Pathirana Sold to KKR : चेन्नईने रिलीज केलेल्या मथिशा पथिराना याला कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केलं असून त्याला तगडी बोली लागली.
advertisement
1/5

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026 Auction) चा मिनी ऑक्शन अबू धाबीमध्ये पार पडत आहे. यावेळी चेन्नई सुपर किंग्जने रिलीज केलेल्या खेळाडूवर मोठी बोली लागली.
advertisement
2/5
धोनीने वैतागून सोडून दिलेला हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून मथिशा पथिराना आहे. मथिशा पथिराना याने मागील आयपीएल हंगामात धोनीला विकेट्सच्या मागे कसरत करायला लावली होती.
advertisement
3/5
मथिशा पथिराना याला चेन्नईने मागील हंगामात 13 कोटींना खरेदी केलं होतं. त्यानंतर आता यंदाच्या हंगामासाठी सीएसकेने त्याला सोडून दिलं होतं. अशातच आता त्याला मोठी बोली लागलीये.
advertisement
4/5
मथिशा पथिराना याला कोलकाता नाईट रायडर्सने अखेरच्या क्षणी विकत घेतलं आहे. त्याला तब्बल 18 कोटींची बोली लागल्याने आता तो सर्व मॅच खेळताना दिसेल.
advertisement
5/5
दरम्यान, केकेआरने कॅमरून ग्रीन आणि मथिशा पथिराना या दोन परदेशी खेळाडूंवर पर्समधील अर्ध्याहून अधिक रक्कम खर्च केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL Auction 2026 : धोनीने वैतागून सोडून दिला, कोलकाताने अचानक एन्ट्री मारून 18 कोटींना विकत घेतला 'वाईडचा किंग'