TRENDING:

'तुझेच मी गीत...' मधील स्वराला ओळखलं का? तेजस्विनी लोणारीच्या हळदीला लावली हजेरी, PHOTO

Last Updated:
Tejaswini Lonari Haldi Ceremony : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा हळदी समारंभ नुकताच पार पडला. या हळदी सोहळ्याला तिच्या ऑनस्क्रिन मुलीनं हजेरी लावली होती. छोटी स्वरा आता खूप मोठी झाली आहे. तुम्ही ओळखलं का?
advertisement
1/7
तेजस्विनी लोणारीच्या हळदीला ऑनस्क्रिन लेकीची हजेरी, स्वराला ओळखणंही कठीण!
लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी लोणारी काही तासातच बोहल्यावर चढणार आहे. तेजस्विनीचं लग्न होतंय. तिच्या लग्नाआधीच्या विधी अत्यंत साध्या पद्धतीनं साजऱ्या झाल्या.
advertisement
2/7
तेजस्विनीचा हळदी समारंभ तिच्या घरी पार पडला. अत्यंत पारंपरिक आणि साधेपणानं तेजस्विनीला हळद लावण्यात आली. हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून तेजस्विनीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
advertisement
3/7
तेजस्विनीच्या हळदीचा समारंभ हा पूर्णपणे घरच्या घरी, कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला. तेजस्विनीनं पिवळी साडी आणि फ्लोरल ज्वेलरी हळदीसा घातली होती.
advertisement
4/7
तेजस्विनीच्या हळदीला तिच्या ऑनस्क्रिन लेकीने देखील हजेरी लावली होती. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत तेजस्विनी लोणारीच्या मुलीची भूमिका साकारणारी स्वराची म्हणजेच अभिनेत्री अवनी तायवडे हिनं हळदीला हजेरी लावली होती.
advertisement
5/7
तेजस्विनीच्या हळदीला स्वराला पाहून चाहत्यांना मालिकेची आठवण झाली आहे. मालिकेतील स्वरा आणि आताची स्वरा यांच्यात खूप फरक दिसून आला. दोघींना पुन्हा एकत्र पाहून चाहत्यांचा आनंद व्यक्त केला.
advertisement
6/7
सोशल मीडियावर तेजस्विनीच्या हळदीचे फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीचा हा नव्या आयुष्याचा प्रवास सुखकर व्हावा, अशी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या लग्नाचे इतर सोहळेही आता चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.
advertisement
7/7
शिवसेना ठाकरे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर बरोबर तेजस्विनीचं लग्न होतंय. तेजस्विनी एका राजकीय कुटुंबाची सून होणार आहे. दोघांच्या घरी लगीन घाई सुरू आहे. काही दिवसांआधीच दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तुझेच मी गीत...' मधील स्वराला ओळखलं का? तेजस्विनी लोणारीच्या हळदीला लावली हजेरी, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल