Tejaswini Lonari : राजकीय नेत्याची झाली बायको, लग्नानंतर तेजस्विनी लोणारीनं सोडला भारत? गेली कुठे?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिनं नुकतंच लग्न केलं. लग्नानंतर तेजस्विनी लोणारीनं भारत सोडून दुसऱ्याच देशात गेल्याचं दिसतंय. तेजस्विनी नक्की गेली कुठे?
advertisement
1/7

मराठी कलाकार</a>ांची लगीन सराई जोरदार सुरू होती. पूजा बिरारी-सोहम बांदेकर, प्राजक्ता गायकवाड, निमिश कुलकर्णी सारख्या बऱ्याच कलाकारांनी लग्न केलं. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचं लग्न देखील 4 डिसेंबर रोजी थाटात पार पडलं." width="1200" height="1600" /> डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठी कलाकारांची लगीन सराई जोरदार सुरू होती. पूजा बिरारी-सोहम बांदेकर, प्राजक्ता गायकवाड, निमिश कुलकर्णी सारख्या बऱ्याच कलाकारांनी लग्न केलं. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचं लग्न देखील 4 डिसेंबर रोजी थाटात पार पडलं.
advertisement
2/7
तेजस्विनी लोणारीनं शिवसेनेच्या युवासेनेचे नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसांतच अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांनी भारत सोडून परदेशात रवाना झाले आहेत. तेजस्विनी नवऱ्यासोबत नेमकी गेली कुठे?
advertisement
3/7
तेजस्विनी आणि समाधान यांचा विवाह मुंबईतील एका सहारा स्टार हॉटेलमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. कुटुंबीय, जवळचे मित्र आणि मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत तेजस्विनी खूपच सुंदर दिसत होती, तर समाधान सरवणकरदेखील क्लासिक लूकमध्ये झळकत होते.
advertisement
4/7
लग्नानंतर लगेचच या नवविवाहित जोडप्यानं लंडन गाठलं आहे. तेजस्विनीनी लंडनच्या रस्त्यावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेत. दोघेही हनिमूनसाठी लंडनला गेले आहेत असं म्हटलं जात आहे. तेजस्विनी समाधान लंडनच्या रस्त्यांवर हातात हात घालून फिरत आहेत.
advertisement
5/7
'Morning walk & talks' असं कॅप्शन देत तेजस्विनीनं लंडनमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत. लग्नानंतर तेजस्विनी आणि समाधान लंडनमध्ये निवांत वेळ घालवत आहेत. लग्नानंतर तेजस्विनी आणि सामाधान लंडनमध्ये फिरण्यासाठी गेले आहेत. लंडनमधील सुंदर हवामान, ऐतिहासिक वास्तू आणि रोमँटिक वातावरणात दोघेही क्वालिटी टाइम एन्जॉय करताना दिसत आहेत.
advertisement
6/7
तेजस्विनीनी तिच्या लग्नाबद्दल कुठेच काहीच चर्चा केली होती. तिचं लग्न होतं याची साधी चुणूकही नव्हती. तेजस्विनीनं थेट समाधान सरवणकर यांच्याबरोबर साखरपुडा करत थेट साखरपुड्याचे फोटोच शेअर केले. समाधान सरवणकर यांच्याबरोबर लग्न केल्यानंतर तेजस्विनी लोणारी सरवणकर या राजकीय कुटुंबाची सून झाली आहे.
advertisement
7/7
तेजस्विनी आणि समाझान यांनी त्यांच्या नव्या आयुष्याच्या सुरुवात केल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव तेला आहे. तेजस्विनीचे लंडनमधील व्हिडिओ आणि फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tejaswini Lonari : राजकीय नेत्याची झाली बायको, लग्नानंतर तेजस्विनी लोणारीनं सोडला भारत? गेली कुठे?