कधीकाळी टेलिव्हिजनची नंबर वन सून, आता मिळत नाहीये एकही सीरियल, आईसोबत लोणचं विकतेय अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कधीकाळी टेलिव्हिजनची नंबर वन असलेली अभिनेत्री आज आईसोबत ऑनलाईन लोणची विकतेय. अभिनेत्रीला कोणी सीरियलमध्ये काम देत नाही का?
advertisement
1/8

ही अभिनेत्री टेलिव्हिजनची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजही टेलिव्हिजनवर तिची क्रेझ कमी झालेली नाही. पण एका हिट मालिकेनंतर ती पुन्हा मालिकेत दिसली नाही.
advertisement
2/8
अभिनेत्रीनं तिच्याच मालिकेतील हिरोबरोबर अफेअर होतं. दोघे लग्नही करणार होते. मात्र दोघांमध्ये काही तरी बिनसलं आणि दोघांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपच्या काही वर्षात अभिनेत्यानं आत्महत्या करत आयुष्य संपवलं.
advertisement
3/8
ब्रेकअपनंतर अभिनेत्री एक बिझनेसमनच्या प्रेमात पडली. त्याच्यावर तिनं शाही लग्न केलं. तिच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली. मालिकेत नाही पण खऱ्या आयुष्यात तिने राजेशाही थाटात लग्न केलं.
advertisement
4/8
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती अभिनेत्री म्हणजेच अंकिता लोखंडे. पवित्रा रिश्ता या मालिकेनं अंकिताला ओळख मिळवून दिली. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांची जोडी मोठ्या पडद्यावर हिट झाली. पवित्र रिश्ता ही मालिका संपल्यानंतर मात्र अंकिता कोणत्याच मालिकेत दिसली नाही.
advertisement
5/8
सुशांतच्या मृत्यूनंतर पवित्र रिश्ता 2 सुरू करण्यात आलं होतं मात्र त्याला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर अंकितानं विक्की जैनबरोबर लग्न केलं. दोघांचं लग्न खूप चर्चेत आलं होतं.
advertisement
6/8
लग्नानंतर अंकिता आणि विक्की यांनी बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली. अंकिताचा नवरा विक्की जैन हा कोळश्याचा व्यापारी आहे. 100-130 कोटींची संपत्ती आहे. अंकिता मालिकेत दिसली नसली तरी ती अनेक रिअलिटी शोमध्ये दिसते. मधल्या काळात तिने काही हिंदी सिनेमातही काम केलं.
advertisement
7/8
अंकिताने काही दिवसांआधीच तिच्या आईबरोबर लोणच्याचा बिझनेस सुरू केला आहे. हा बिझनेस तिच्या आईचा असला तरी अंकिता त्यात पूर्ण मदत करतेय. अंकिता आईबरोबर लोणच्याची ऑर्डर घेण्यासाठी सोशल मीडियावर चाहत्यांना आवाहन करताना दिसली.
advertisement
8/8
अंकिता आणि तिच्या आईचा नारायण नमकींस नावाचाही एक ब्रँड आहे. या ब्रँडच्या अंतर्गत त्या अनेक वस्तू विकतात. हा ब्रँड तिची आई चालवते. ती तिच्या हाताने पदार्थ बनवते. मायलेकीचा हा बिझनेस स्टार्टिंग स्टेजमध्ये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कधीकाळी टेलिव्हिजनची नंबर वन सून, आता मिळत नाहीये एकही सीरियल, आईसोबत लोणचं विकतेय अभिनेत्री