TRENDING:

मराठी अभिनेत्रीला 17 वर्षांपासून सतत येतात शिट्यांचे आवाज, नेमकं झालंय काय?

Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गेली 17 वर्ष तिच्या कानात शिट्ट्यांचे आवाज सहन करतेय. अभिनेत्रीला नेमकं काय झालं आहे हे तिनं नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.
advertisement
1/7
मराठी अभिनेत्रीला 17 वर्षांपासून सतत येतात शिट्यांचे आवाज, नेमकं झालंय काय?
पडद्यावर दिसणारे, सतत प्रेक्षकांना हसवणारे कलाकार पडद्यामागे मात्र अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा, घटनांचा सामना करत असतात. अशीच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. जी गेली 17 वर्ष एका दुर्मिळ आजाराचा सामना करतेय. या आजारामुळे तिला सतत कुकरच्या शिट्ट्यांचे आवाज ऐकू येतात. या आजाराशी झुंज देत ती गेली अनेक वर्ष मालिकांमध्ये काम करतेय. सध्या ती एका टॉपच्या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावतेय.
advertisement
2/7
ठरलं तर मग ही सध्या नंबर 1 ची मालिका आहे. या मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षकांची लाडकी आहे. लहान - मोठी सगळीच पात्र प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहेत. अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे सुमन काकी. नेहमी हसून खेळून राहणारी सुमन खऱ्या आयुष्यात मात्र अनेक गोष्टी सजन करत इथवर पोहोचली आहे.
advertisement
3/7
'ठरलं तर मग' या लोकप्रिय मराठी मालिकेत सुमनची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा केतकर-वर्तक हिनं नुकत्याच एका मुलाखतीत तिला झालेल्या एका दुर्मिळ आजाराबद्दल सांगितलं.
advertisement
4/7
FM KMW 29 ला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धानं सांगितलं, "मी एक डाव भटाचा हे नाटक करत होते. नाटक सुरू असताना मला अचानक सर्दी झाली. त्याच वेळी माझ्या कानात विचित्र आवाज सुरू झाले. पूर्वी ज्या वाफेच्या कुकरची शिटी मोठ्याने वाजायची तसाच तो आवाज होता. मला आधी वाटलं सर्दी उतरल्यावर हे आवाज थांबतील. पण तसे झालेच नाही. गेली 17 वर्ष ते आवाज माझ्या कानात सतत येत आहेत."
advertisement
5/7
श्रद्धाने पुढे सांगितलं की, "सुरुवातीच्या काळात हा त्रास खूप असह्य होता. सतत येणाऱ्या आवाजांमुळे मानसिक अवस्था बिघडली होती. कालांतराने परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकून घेतलं कारण या आजारावर ठोस असा कोणताही उपाय नाही असं डॉक्टरांनी सांगितलं."
advertisement
6/7
"त्याला 'Tinnitus' नावाचा आजार म्हणतात. त्या शिट्टीचा आवाज गेला नाही त्याचा परिणाम माझ्या ऐकण्याच्या क्षमतेवर झाला. जोपर्यंत मी तरुण वय होतं तो पर्यंत चालून गेलं. पण नंतर नंतर मला ऐकू येत नव्हतं आणि मला कळायचं नाही. एक क्षण असा आला की, माझा आत्मविश्वासच गेला. 'सरस्वती' मालिकेनंतर हा त्रास खूप वाढला म्हणून मी काम थांबण्याचा निर्णय घेतला.'
advertisement
7/7
श्रद्धाने पुढे सांगितलं, "माझा नवरा मला म्हणाला, तू श्रवणयंत्र वापर आणि मग मी विचार करून ते घेण्याचा निर्णय घेतला. छोट्यातलं छोटं श्रवणयंत्र घेतलं. मग आम्ही कस्टमाइज मशीन बनवून घेतलं. आताही मला ते मशीनवापरुन काम करावं लागतं. त्यामुळे मला नीट ऐकू येतं. पण माझ्या कानात येणारे आवाज आजही सुरूच आहेत."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मराठी अभिनेत्रीला 17 वर्षांपासून सतत येतात शिट्यांचे आवाज, नेमकं झालंय काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल