TRENDING:

'त्यांना माझ्या बम्स आणि ब्रेस्ट्सवर...' फिल्ममेकरची डिमांड ऐकून शॉक झालेली मराठमोळी अभिनेत्री, धक्क्याने आजही रडते

Last Updated:
Actress Horrifying Experience on Film set: बॉलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री सध्या तिच्या अभिनयापेक्षा एका धक्कादायक खुलाशामुळे चर्चेत आली आहे.
advertisement
1/8
फिल्ममेकरची डिमांड ऐकून शॉक झालेली मराठमोळी अभिनेत्री, धक्क्याने आजही रडते
मुंबई: बॉलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री राधिका आपटे सध्या तिच्या अभिनयापेक्षा एका धक्कादायक खुलाशामुळे चर्चेत आली आहे. राधिका म्हणजे पडद्यावर बेधडकपणे वावरणारी अभिनेत्री, पण याच राधिकाने तिच्या करिअरच्या सुरुवातीला जे काही सोसलंय, ते ऐकून कोणत्याही महिलेच्या अंगावर काटा येईल. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील काही दिग्दर्शकांच्या अश्लील मागण्यांबद्दल बोलताना राधिकाचा आजही थरकाप उडतो.
advertisement
2/8
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राधिकाने आपल्या जुन्या जखमांवरील खपली काढली. २००० च्या दशकाच्या उत्तरार्धात ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीत काम करत होती.
advertisement
3/8
तिने सांगितलं की, "मला पैशांची प्रचंड गरज होती, म्हणून मी काही साऊथचे सिनेमे स्वीकारले. पण एका सेटवरचा अनुभव इतका भयंकर होता की, आज आठवलं तरी मला रडू येतं."
advertisement
4/8
राधिकाने पुढे सांगितलं की, एका छोट्या गावात शूटिंग सुरू होतं. संपूर्ण सेटवर ती एकटीच महिला होती. तिथे तिचा स्वतःचा मॅनेजर किंवा एजंटही नव्हता. त्यावेळी तिला तिथल्या काही क्रू मेंबर्सनी आणि दिग्दर्शकांनी तिच्या शरीराच्या अवयवांवरून टोकलं.
advertisement
5/8
ते तिला म्हणायचे, "अम्मा, तुझ्या बम्स आणि ब्रेस्टवर अजून पॅडिंग लाव!" त्यांना तिचे शरीर अधिक आकर्षक दिसावं असं वाटत होतं. राधिकाने विचारलं, "अजून किती पॅडिंग लावू? एखाद्याला किती गोल बनवू शकता तुम्ही?" पण तिथे तिचं ऐकणारं कोणीच नव्हतं.
advertisement
6/8
राधिकाने त्या काळच्या असुरक्षिततेबद्दल बोलताना म्हटलं की, "मी तिथे एकटीच स्त्री होते. निर्मात्यांनी मला स्वतःची टीम आणू दिली नव्हती. माझ्या टीममध्येही सगळे पुरुषच होते, कारण त्यांनीच मला कामावर ठेवलं होतं. अशा वातावरणात काम करताना जो मानसिक त्रास झाला, तो ट्रॉमेटिक होता. मला कधीही अशा परिस्थितीत पुन्हा अडकायचं नाहीये, कारण ते आठवलं की मला रडू येईल."
advertisement
7/8
राधिकाच्या मते, इंडस्ट्रीत अनेक लोक कुठे उभे आहेत, हेच त्यांना ठाऊक नसतं. ही समस्या केवळ पुरुषांचीच नाही, तर अनेक महिलाही मोठ्या पदावर असूनही या व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी पुढे येत नाहीत, याबद्दल तिने खेद व्यक्त केला.
advertisement
8/8
सध्या राधिका आपटे ही तिच्या 'धुरंधर' सिनेमाशी संबंधित काही वक्तव्यांमुळेही चर्चेत आहे. पण या वादाच्या पलीकडे जाऊन तिने मांडलेलं हे वास्तव सिनेसृष्टीतील काळ्या बाजूवर प्रकाश टाकणारं आहे. राधिकाने आजवर 'पार्च्ड', 'फोबिया' आणि अलीकडेच आलेल्या टिस्का चोप्राच्या 'साली मोहब्बत' मधून आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'त्यांना माझ्या बम्स आणि ब्रेस्ट्सवर...' फिल्ममेकरची डिमांड ऐकून शॉक झालेली मराठमोळी अभिनेत्री, धक्क्याने आजही रडते
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल