ना रवीना, ना कतरिना, 'या' अभिनेत्रीसोबत अक्षय कुमरानं दिल्यात सर्वात जास्त हिट चित्रपट
- Published by:News18 Trending Desk
- Written by:News18 Marathi
Last Updated:
खिलाडी कुमार अक्षयनं जवळपास प्रत्येक मोठ्या अभिनेत्रीसोबत काम केले आहे. पण लोक म्हणतात की, त्याची जोडी फक्त रवीना टंडन आणि कतरिना कैफसोबतच हिट ठरली. मात्र तसे नाही, अक्षयने या दोन अभिनेत्रींपेक्षा आणखी एका अभिनेत्रीसोबत जास्त चित्रपट केले आहेत.
advertisement
1/6

अक्षय कुमारची जोडी 90 च्या दशकात रवीना टंडनसोबत चांगलीच चर्चेत होती. 2008 पासून त्याची कतरिना कैफसोबतची जोडीही हिट ठरली होती. याकाळात अक्षय कुमारची जोडी आणखी एका अभिनेत्रीसोबत चांगलीच जमली होती आणि या जोडीनं एकत्र 4 हिट चित्रपट दिले आहेत. कोण आहे ही अभिनेत्री असा सर्वांना प्रश्न पडला असेल.
advertisement
2/6
रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि हे चित्रपटही हिट ठरले. या चित्रपटांदरम्यान दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती, मात्र नंतर दोघे वेगळे झाले. रवीनाने अक्षयसोबत 'खिलाड़ियों के खिलाडी', 'मोहरा', 'कीमत', 'पोलिस फोर्स' सारखे चित्रपट केले.
advertisement
3/6
तर, कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांनी 2006 मध्ये आलेल्या 'हमको दीवाना कर गये'मध्ये काम केले होते. यानंतर दोघांनी 'वेलकम', 'ब्लू', 'दे दना दन' आणि 'सूर्यवंशी'मध्ये काम केले. कतरिना आणि अक्षयची जोडी खूप आवडली होती.
advertisement
4/6
या दोन अभिनेत्रींपेक्षा अक्षय कुमारने लारा दत्तासोबत जास्त काम केले. 2003 मध्ये रिलीज झालेल्या 'अंदाज' या चित्रपटात अक्षयने लारासोबत पहिल्यांदा काम केले होते. या चित्रपटात प्रियांका चोप्रा देखील होती आणि तो हिट झाला होता.
advertisement
5/6
यानंतर लारा दत्ता आणि अक्षय कुमारने 'इन्सान', 'भागम भाग', 'दोस्ती', 'ऑन: मेन अॅट वर्क', 'ब्लू' आणि 'हाऊसफुल'मध्ये काम केले. त्यापैकी 4 चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले.
advertisement
6/6
2021 मध्ये लारा दत्ता आणि अक्षय कुमार यांची जोडी पडद्यावर पाहायला मिळाली. या दोघांनी अनेक वर्षांनी 'बेल बॉटम' चित्रपटात काम केले. आता दोघेही 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटात पुन्हा दिसणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना रवीना, ना कतरिना, 'या' अभिनेत्रीसोबत अक्षय कुमरानं दिल्यात सर्वात जास्त हिट चित्रपट